723 Post Views
नाशिक रोड : उमेश देशमुख
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या गिरणारे येथील शाखेचे उद्घाटन करतांना मला विशेष आनंद होत आहे, कारण माझे आजोबा या बॅंकेच्या संस्थापक संचालकांपैकी एक होते. पारदर्शकता व सचोटीच्या बळावर या बँकेने एनपीए ४४ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणल्याने जनतेचा सहकारावर विश्वास दृढ करण्यासाठी मदत झाली आहे. संचालक मंडळाला याचे श्रेय जाते. बॅंकेच्या गिरणारे शाखेत ठेवी ठेऊन, कर्ज घेऊन वेळेत फेडून, सहकार्य करावे, असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
बँकेची २८ वी शाखा गिरणारे येथे सुरू झाली. शाखेचे उदघाटन केल्यानंतर खासदार वाजे बोलत होते. आमदार सरोज आहिरे, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, माजी आमदार योगेश घोलप, त्र्यंबकराव गायकवाड, लालाशेठ जैन, विष्णुपंत म्हैसधुणे, दिलीप थेटे, निवृत्ती घुले, विलास शिंदे, बाळासाहेब हांडोरे, पुंडलिक थेटे, राजाराम धनवटे, मुरलीधर पाटील, बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, बँकेच्या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हॉटेल जत्रा परिसरात स्वप्नांच्या घरासाठी विश्वासपात्र ठिकाण “समृद्धी बिल्डकॉम”
