Home राजकारण नाशिक पूर्व मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जगदीश गोडसे यांच्यासोबत अतुल...

नाशिक पूर्व मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जगदीश गोडसे यांच्यासोबत अतुल मते यांच्या नावाची चर्चा ; उमेदवारीसाठी मते समर्थक प्रयत्नात

0
1,690 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून प्रेस कामगार नेते जगदिश गोडसे इच्छूक आहे. मात्र अचानकपणे आडगाव येथील बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते अतुल मते यांचे नाव  उमेदवारीसाठी चर्चेत येत आहे. त्यांच्या समर्थकांनी तसा प्रचार देखील सुरू केलेला दिसतोय. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अतुल मते आणि जगदीश गोडसे यांच्यामध्ये स्पर्धा होऊ शकते.

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. २०१४ मध्ये बाळासाहेब सानप आणि २०१९ मध्ये ऍड. राहुल ढिकले आमदार म्हणून निवडूण आले आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात खासदार राजाभाऊ वाजे यांना नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात आघाडी मिळू शकली नाही. त्यामुळे नाशिक पूर्व भाजपचा बालेकिल्ला असल्याच्या चर्चेवर शिक्कमोर्तब झाले.

भाजपच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे प्रयत्न केले जात आहे. प्रेस कामगार नेते गोडसे यांचे नाव पुढे करुन प्रचार केला जातो आहे. गोडसे अलीकडच्या काळात थेट शरद पवार यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गोडसे उमेदवारीचे बाशिंग बांधण्यास पुढे सरसावत असताना दूसरीकडे आडगाव येथील सामजिक कार्यकर्ते अतुल मते यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले जाते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार गोडसे की मते किंव्हा अजुन एखादा तिसरा उमेदवार ऐनवेळी पुढे येऊ शकतो, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे.
राष्ट्रवादीकडून धक्कातंत्र ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार राजकारणात धक्का देण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात पवार साहेब ऐनवेळी नविन उमेदवार देऊन सरप्राइज म्हणजेच धक्का तंत्राचा वापर करू शकतात, अशी चर्चा खुद्द राष्ट्रवादीचे पदाधिकारी करताना दिसतात. खरोखर असे घडलेच तर मग हा सरप्राइज उमेदवार कोण असू शकतो, याविषयी उत्सुकता आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version