Home राजकारण Breaking News : नाशिक शिक्षक मतदार संघात शिंदे गटाचे किशोर दराडे यांची...

Breaking News : नाशिक शिक्षक मतदार संघात शिंदे गटाचे किशोर दराडे यांची नऊ हजार ६२८ मतांची आघाडी ! ; दुसऱ्या पसंतीचे मतमोजनीवर विजय अवलंबून

0
867 Post Views

Breaking News – नाशिक : प्रतिनिधी 

नाशिक शिक्षक मतदार संघातील संघाच्या मत संघाची मतमोजणी सुरू आहे यामध्ये विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांनी अपक्ष विवेक कोल्हे यांच्या विरोधात ९६२८ मतांची आघाडी मिळवलेली आहे. पहिल्या पसंतीचे अद्याप ४८४८  मतांची मोजणी शिल्लक आहे. विजयासाठी ठरवून दिलेल्या पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीवर उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक या वेळेला अतिशय अटीतटीची होत असल्याचे चित्र मतमोजणी दरम्यान दिसून येत आहे.पहिल्या पसंतीचा कोटा विजयासाठी ठरवून दिलेला आहे. मात्र अद्याप तो पूर्ण करण्यास एकाही उमेदवाराला अपेक्षित मतदान झालेले नाही.  अंदाजे ३४ हजार  पहिल्या पसंतीचे मते विजयासाठी आवश्यक आहे. तेवढी मते एकाही उमेदवाराला मिळाली नसल्याने आता दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसे झाले तर दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतांवर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

सर्वात विशेष म्हणजे अपक्ष  उमेदवार विवेक कोल्हे  दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार एड. संदीप गुळवे  तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेली आहे. मात्र त्यांना निर्णायक मते मिळाली नाही, म्हणून आता दुसऱ्या पसंतीचे मते मोजली जाणार आहे. यावर उमेदवारांचे जय पराजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

तिसऱ्या फेरीची आकडेवारी : ६४८४८ हजार मतमोजणी 

किशोर दराडे , शिंदें गट शिवसेना :  २६३१६
विवेक कोल्हे ,अपक्ष : १६६८८
संदीप गुळवे ठाकरेंची शिवसेना :  १६३४०

नाशिक विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट 2024 – 25
एकूण मतदान – 64 हजार 853
——————-
किशोर भिकाजी दराडे : 26476,अँङ गुळवे संदीप गोपाळराव (पाटील) : -16280,ॲड महेंद्र मधुकर भावसार :131,कोल्हे विवेक बिपिनदादा: 17372,भागवत धोंडीबा गायकवाड : 9,अनिल शांताराम तेजा : 7,अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे : 259,इरफान मो इसहाक : -17,कचरे भाऊसाहेब नारायण :1195 ,कोल्हे सागरदादा रविंद्र :66 ,कोल्हे संदीप वसंतदादा : 74,गव्हारे गजानन पंडीत : 151,गुरुळे संदिप वामनराव : 152,झगडे सचिन रमेश :107,दिलीप काशिनाथ डोंगरे: 78,आर.डी.निकम : 552,पै.डॉ.पानसरे छगन भीकाजी :10 ,बोठे रणजित नानासाहेब: 0,महेश भिका शिरुडे : 15,रतन राजलदास चावला : 68,संदीप गुळवे पाटील : 132,वैध मते : 63151,अवैध मते : 1702

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version