नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व मतदार संघातील आमदार राहुल ढिकले सध्या अलर्ट मोडवर दिसतात. खासदार राजाभाऊ वाजे यांच्याप्रमाणे त्यांनी प्रचारात आघाडी मिळवलेली दिसते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तसेच नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार सुरू झालेला दिसतो. विशेष म्हणजे संपूर्ण मतदार संघ पिंजून काढून त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसते.
नाशिक लोकसभा मतदार संघामधून निवडून येणारे खासदार राजाभाऊ वाजे यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला होता. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत थेट संपर्क साधता आला. तुलनेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे मतदार संघात वाजे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली. त्याचे रूपांतर विजयाचे मताधिक्य वाढण्यात झाला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार एड. राहुल ढिकले यांनी विधानसभा निवडणूक पार्श्भूमीवर “आमदार आपल्या दारी” या उपक्रमाला सुरूवात केलेली दिसते. त्याचा निश्चितपणे फायदा मताधिक्य वाढीत होईल. असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिक पूर्व मतदार संघातील शेतकरी वर्गांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांचा भर दिसून येतो आहे. मळे वसाहती मधील शेतकऱ्यांच्या घरी, बांधावर जाऊन ते भेटी घेताना दिसतात. आमदार ढिकले यांनी मळे वसाहतीमधील प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे केली. त्यामुळे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दावा समर्थकांकडून केला जातो आहे. मळे वसाहती मधील प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली. यानंतर शहरी भागात प्रचाराला सुरुवात झाली आहे. नाशिकरोड, जेलरोड परिसरात सध्या प्रचार सुरू आहे. “आमदार आपल्या दारी” या उपक्रमाला नागरिक उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते देत आहे.
ढिकले विजयाची पूनरार्वृत्ती करणार !
ढिकले घराणे राजकारणात नवीन नाही. आमदार ढिकले यांचे वडील स्व. उत्तमराव ढिकले यांनी नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद , जिल्हा बँकेचे अध्यक्ष,नाशिकचे महापौर, आमदार, खासदार आदीसह विविध पदे भूषविली आहे. त्यांचे बंधू डॉ. सुनिल ढिकले नामवंत असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आहे. थोडक्यात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आमदार राहुल ढिकले यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळालेले आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या प्रचाराला आमदार आपल्या दारी उपक्रम राबवत सर्वांच्या आगोदर सुरूवात केली आहे.