नाशिक शिक्षक मतदार संघात मागील निवडणूकांमध्ये काही शिक्षकांनी पाकिटे अन् पैठणी घेऊन मतदान केल्याची चर्चा आहे. त्यामुळे खरा हाडाचा शिक्षक निवडून येऊ शकला नाही, संस्थाचालक आमदार झाले. या वेळेला देखील वेगळी स्थिती दिसत नाही, प्रमुख तीन उमेदवार संस्थाचालक आहेत. त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. ते निवडूण आले तर शिक्षकांच्या समस्या सोडविण्याऐवजी शिक्षकांची पिळवणूक होऊ शकते. शिक्षकांऐवजी संस्थाचालक निवडूण येणार असेल तर शिक्षक मतदार संघाचे संस्थाचालक मतदार संघ असे नामकरण करायला हवे, अशी उपरोधक मागणी निखिल पवार यांनी करून वस्तुस्थितीवर प्रकाश झोत टाकला.
नाशिक शिक्षक मतदार संघामधील अपक्ष उमेदवार आर. डी. निकम यांच्या प्रचारासाठी मालेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत निखिल पवार बोलत होते. पवार यांनी केलेले भाषण सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी शिक्षक मतदार संघामधील वास्तवावर टाकलेला प्रकाशझोत आणि त्यावर केलेले भाष्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षक मतदार संघ हा केवळ नावापुरता उरला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या आणी वेबसाईटवर पोहचण्यासाठी http://nashikbatmidarnews.com वर क्लिक करा
या मतदारसंघात संस्थाचालक निवडून जातात,आमचे काही सहकारी शिक्षक प्रलोभनास बळी पडतात, त्यामुळे शिक्षकांवर टीका देखील केली जाते, काही शिक्षक पाकिटे घेतात,तर काही पैठणी घेतात,त्यामुळे संस्थाचालक निवडून जातात आणि हाडाचा शिक्षक यापासून दूर असतो.
नाशिक शिक्षक मतदार संघात सध्याच्या घडीला मागील निवडणूकी प्रमाणे परिस्थिती निर्माण झालेली दिसते. पुन्हा संस्थाचालकच निवडून जाणार की काय अशी शक्यता वाटते. परंतु सुज्ञ शिक्षकांनी संस्थाचालकांना अजिबात मतदान करू नये.त्यांनी शिक्षकांसाठी झटणारा, लढणारा, संघर्ष करणाऱ्या शिक्षकालाच मतदान करावे. असे निखिल पवार यांनी आवाहन केले. आर.डी. निकम यांच्या पाठीमागे शिक्षकांनी उभे राहावे, त्यांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन निवडूण आणावे,असे आवाहन पवार यांनी केले. याप्रसंगी मालेगांव विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार,सुशांत कुलकर्णी, कुंदन चव्हाण,शिक्षक जे जे निकम,एम एम पवार,सुधीर पाटील,निंबा बोरसे,नरेंद्र घोरपडे, हरीश निकम आदी. उपस्थितीत होते.
तर शिक्षक शिकविणार कसे ?
शिक्षक इतिहास, नागरिकशास्त्र शिकवत असतात. लोकशाहीचे मूल्य टिकविण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे शिक्षकांवर उत्तम पिढी घडविण्याची जबाबदारी असते. आता हेच शिक्षक निवडणुकीमध्ये प्रलोभनांना बळी पडत असेल तर त्यांना विद्यार्थ्याना शिकविण्याचा नैतिक अधिकार राहील का ?, असा प्रश्न निखिल पवार यांनी भाषणातून व्यक्त केला.