Home Blog जगदीश गोडसे यांना विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी खासदार राजाभाऊ वाजे यांनी घ्यावी ;...

जगदीश गोडसे यांना विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी खासदार राजाभाऊ वाजे यांनी घ्यावी ; माजी महापौर अशोक दिवे यांचे आवाहन

0
876 Post Views

नाशिकरोड, प्रतिनिधी
प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांचे संघटन कौशल्य आणि कामकाज उत्तम आहे. त्यांनी प्रेस कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रामाणिकपणे लढा दिला, संघर्ष केलेला आहे. त्यामुळे त्यांना आता विधानसभेत पाठविण्याची वेळ आलेली आहे. तशी संधी देखील आहे.यासाठी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी जबाबदारी घ्यायला हवी, असे आवाहन माजी महापौर अशोक दिवे यांनी केले.

याप्रसंगी प्रेस मजदुर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदिश गोडसे,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्द्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, माजी जनरल सेक्रेटरी रामभाऊ जगताप, माजी महापौर अशोक भाऊ दिवे मा. नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, उपाध्यक्ष कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, जॉईंट सेक्रेटरी अविनाश देवरुखकर हे उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या आणी वेबसाईटवर पोहचण्यासाठी http://nashikbatmidarnews.com वर क्लिक करा

येथील आयएसपी सीएनपी प्रेसच्या मजदूर संघातर्फे प्रेसच्या मजदूर संघाच्या सभागृहात रविवारी (दि.१६ ) सायंकाळी नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी महापौर दिवे बोलत होते. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे म्हणाले की, माझा विजय हा संपूर्ण महाविकास आघाडी मधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आहे. एका सामान्य शिक्षकाला, कामगाराला शरद पवार यांनी खासदार केले, भाजप सरकारच्या धोरणांनी त्रस्त, पिंजलेल्या कष्टकरी शेतकरी, कामगारांनी मला खासदार केल्याचे खासदार भगरे यांनी म्हटले.

कामगार विरोधी कायद्यांना विरोध : खा.राजाभाऊ वाजे

निवडणूक प्रचारा दरम्यान प्रेस कामगार नेते रामभाऊ जगताप आणि माझ्या मध्ये चर्चा झाली. चर्चेत केंद्र शासनाने जवळपास २९ कायदे कामगार विरोधी केल्याचे जगताप यांनी मला सांगितले. त्यावेळी मी त्यांना शब्द दिला होता की, निवडून आल्यानंतर आपण याविषयी काय निर्णय घ्यायचा ते ठरवू, त्यासाठी तुमचे मार्गदर्शन लागेल. त्याप्रमाणे मी आज तुम्हाला आश्वासन देतो की, कामगारांच्या विरोधात असलेले २९ कायदे रद्द करण्यासाठी केंद्र शासनाला भाग कसे पाडायचे, याविषयी लवकरच प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जूंद्रे आणि जगताप यांची बैठक घेऊ, त्यामध्ये विचार विनिमय करुन एक दिशा ठरविली जाईल, असे आश्वासन खासदार वाजे यांनी प्रेस कामगारांना दिले.

इतर महत्वाच्या बातम्या आणी वेबसाईटवर पोहचण्यासाठी http://nashikbatmidarnews.com वर क्लिक करा

एक विचाराचे लोक संसदेत पाठविले : जगदीश गोडसे

लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी एका विचाराचे नेते संसदेत पाठविलेले आहे. त्यामध्ये राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे,शोभा बच्छाव यांचा समावेश आहे. त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य आज आम्हाला मिळाले. त्याबद्दल आम्ही सर्व कामगार आनंदी झालो आहोत. १३ डिसेंबर १९२५ रोजी प्रेसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहे. प्रेस स्थापनेपूर्वी देशातील सर्व भागात ब्रिटिशांनी जागेसाठी आढावा घेतला होता.चलनी नोटांच्या कारखान्यासाठी शाईला अनुकूल वातावरण कोणत्या भागात असेल याचा शोध घेतला जात होता. त्यावेळी नाशिकची जागा उत्तम असल्याचे दिसून आले. तेव्हापासून ते आजपर्यंत नाशिकच्या प्रेसने भारतासह वेगवेगळ्या देशांच्या चलनी नोटांची छपाई केली आहे. अशी माहिती देत प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांनी प्रेसच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version