Home Blog विजेचा लपंडाव रोखा, अन्यथा तीव्र आंदोलन ; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा...

विजेचा लपंडाव रोखा, अन्यथा तीव्र आंदोलन ; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा 

0
402 Post Views

नाशिकरोड, प्रतिनिधी
चार दिवसापासून नाशिक रोड, शहर, ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक व व्यावसायिकांचे हाल होत आहेत. शेतक-यांचे नुकसान होत आहे. महावितरणने वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता डोंगरे यांना निवेदन दिले. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.

निवेदनाचा आशय असा – एकलहरे येथे ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तो दिवसात दोन-दोन तास सुरु ठेवण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते. त्याचे नियोजन योग्य पध्दतीने केले जात नाही. त्यामुळे नागरीकांचे मोठे हाल होत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे कठीण होत आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर केल्यास पिकांना वेळेवर पाणी देता येईल.यावेळी माजी आमदार योगेश घोलप, उबाठाचे युवा नेते योगेश गाडेकर,माजी नगरसेवक भारती ताजनपुरे, कन्नू ताजणे, उत्तम कोठुळे, किरण डहाळे, अंबादास ताजनपुरे, सागर भोर, रमेश पांळदे, प्रशांत दिवे, योगेश देशमुख, अशोक जाधव, सागर निकाळे, मिलिंद मोरे,शिवा गाडे, राजू मोरे, विजय भालेराव, अनिल गायखे, मंगेश पोरजे, कुलदीप जाधव, अंबादास ताजनपुरे, किशोर कानडे, संजय गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version