नाशिक – सिन्नर टोलवेज कंपनीने तातडीने नाशिकरोड ते शिंदे दरम्यानच्या उपरस्त्यासह मुख्य महामार्गाची दुरवस्था झाली असुन संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज पालखी निघण्यापूर्वी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी यामागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शिन्नर टोलवेज कंपनीचे व्यवस्थापक नवनाथ केदार दिपक वैद्य यांना देण्यात आले आहे.तर निश्चितच रस्त्याची डागडुजी दोन दिवसात करु, असे अश्वासन टोल प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळला दिले आहे.
नाशिक – पुणे महामार्गावर नियमित टोल वसुली होत असताना देखील शिंदे ते नाशिकरोड दरम्यान सर्व्हिस रोड हा मृत्यू चा साफळाच बनला आहे. टोलनाका परिसरात अनेक मालवाहतूक गाड्या बेकायदेशीर पणे उभ्या असतात.दरम्यान अनेक अपघात या रस्त्यांवर घडलेले आहेत.
रस्त्याची दुरुस्ती होत नसेल तर प्रशासनाने टोल वसुली थांबवावी.पेट्रोल पंपांचे महामार्ग विभाजक बंद करण्यात यावेत व मालवाहतूक गाड्यांना पर्यायी पार्किंग व्यवस्था संबधित प्रशासनाने उभारावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी,मोतीराम जाधव, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष संदीप जाधव, प्रशांत बच्छाव, कैलास कळमकर, कुमार गायधनी, मनोज गायधनी, अभिषेक गायखे, विक्रम गायखे,बाळा कासार,सोनु टावरे, बापु गावीत,गणेश जाधव, चेतन सांगळे,शुभम भड,अदी खाडे,साहिल ढेरींगे,धिरज मुनोत यासह कार्यकर्ते उपस्थित होते.