633 Post Views
दिंडोरी : अशोक निकम
दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ सुनिता लहांगे यांची बिनविरोध निवड झाली,सौ कल्पना गांगोडे यांनी रोटेशन पध्दतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी सौ सुनिता लहांगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता,आज झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी सौ लहांगे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली, निवडीनंतर तहसिलदार मुकेश कांबळे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
