662 Post Views
नाशिक प्रतिनिधी : नशिक शिक्षक मतदार संघात बुधवारी ( दि १२ ) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस होता. शिंदे गटाच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावात साधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे यांनी माघार घेतली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ( उबाठाचे ) ऍड. संदीप गोपाळराव गुळवे यांच्या नावात साधर्म्य असणाऱ्या दोन उमेदवारापैकी एकाने म्हणजेच गुळवे संदीप नामदेवराव (पाटील) यांनी माघार घेतली. दुसरे संदीप वामनराव गुळवे यांनी अर्ज कायम ठेवला आहे. त्याचप्रमाणे संजिवनी शिक्षण संस्थेचे म्हणजेच माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू डॉ. विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या नावाचे साधर्म्य असणारे रवींद्र सागरदादा कोल्हे आणि संदीप वसंतदादा कोल्हे यांचे अर्ज कायम आहेत. त्यामुळे नावात साधर्म्य असल्याने काहीसा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मात्र शिक्षक मतदार हे सुशिक्षित मतदार असल्यामुळे त्यांना असली नकली उमेदवार नेमका कोणता, हे शोधण्याविषयी अधिक त्रास होणार नसल्याचे बोलले जात आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक या वेळेला अत्यंत वादग्रस्त होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते उमेदवारी अर्ज माघार घेण्यापर्यंत वादविवाद, भांडणे, तंटा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी ( दि.१२ ) उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहे. तर काही व्यक्तींनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे असली नकलीचा मुद्दा डोकेदुखी ठरु शकतो. अशी चर्चेत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये एड. संदीप गोपाळराव गुळवे आणि विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल, असे बोलले जात असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. विवेक बिपिनदादा कोल्हे उमेदवार आहे. त्यांचे नाशिक जिल्ह्यात नातेसंबंध व मोठा गोतावळा, मित्रपरिवार आहे. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदार संघात या वेळेला तिरंगी लढत होईल, त्यामध्ये विद्यमान आमदार किशोर दराडे, एड. संदीप गोपाळराव गुळवे आणि अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव प्रभावी उमेदवार असलेले डॉ. विवेक बिपिनदादा कोल्हे यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवार असे
एड. संदीप गोपाळराव गुळवे, विद्यमान आमदार किशोर दराडे, डॉ.विवेक बिपिनदादा कोल्हे,ऍड. महेंद्र भावसार, भगवान गायकवाड, अनिल तेजा, अमृतराव शिंदे, इरफान इसपाक, भाऊसाहेब कचरे, सागरदादा कोल्हे ,संदीप गुळवे, गजानन गवारे, दिलीप डोंगरे, आर.डी. निकम, छगन पानसरे, रणजीत बोठे, महेंद्र शिरोळे, महेश शिरुडे, रतन चावला, संदीप गुळवे, सचिन झगडे आदी.
अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची नावे
गुळवे संदीप नामदेवराव (पाटील), शेख मुख्तार अहमद, दराडे किशोर प्रभाकर, रुपेश लक्ष्मण दराडे,जायभाये कुंडलिक दगडु,दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे,रखमाजी निवृत्ती भड, पंडित सुनील पांडुरंग,गांगर्डे बाबासाहेब संभाजी,अविनाश महादू माळी,निशांत विश्वासराव रंधे, दिलीप बापुराव पाटील (डि.बी. पाटील सर),डॉ. राजेंद्र एकनाथराव विखेपाटील,धनराज देविदास विसपूते,प्रा. भास्कर तानाजी भामरे (सर) आदी.
