इगतपुरी:विक्रम पासलकर
पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात काल शुक्रवारी ( दि.७ ) जून रोजी मृग नक्षत्राच्या पहिल्यापावसाने जोरदार हजेरी लावली. संपूर्ण तालुक्यात सायंकाळी सहा वाजेंच्या दरम्यान वादळ आणि वा-याच्या पावसाने घरांचे,गोठयांचे पत्रे, कौले उडून लाखो रूपयांची हानी झाली आहे. काही ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले.
कु-हेगाव येथील श्रीमती विठाबाई विष्णु गोडसे यांच्या घरांचे जवळपास पन्नास पेक्षा जास्त पत्रे उडाले असून भिंति ला मोठ मोठे तड़े गेले आहेत.विशेष म्हणजे ज्या खोली चे पत्रे उडाले तेव्हा तिथे कुणीही नव्हते घरातील त्यांचा मुलगा राहुल बाहेर गाय पाजत होता तर दूस-या खोलीत लहान मुले व श्रीमती गोडसे व सुनबाई होत्या त्यांना क्षणात क़ाय झाले क़ाय नाही त्यामुळे एकच धावपळ उडाली. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी घरांचे आणि घरातील धान्य आणि इतर वस्तुंचे असे एकूण लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
शेजारी च असलेले दशरथ कचरू धोंगड़े यांच्या घरांचे व सायकल मार्ट दुकानाचे देखील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच जवळच असलेल्या कैलास रूंजा धोंगड़े यांचे शेड वर मोठे झाड़ उन्मळले त्यामुळे त्यांचे लोखंडी पत्रे असलेले शेड भुईसपाट झाले आहे. गावात अनेक नागरिकांचे देखील असेच नुकसान झाल्याचा अंदाज असून ठीक ठिकाणी रस्त्यावर झाड़े मोडून पडली असल्याचे दिसले.
आज सकाळी तलाठी कैलास अहिरे यांनी गावात घटनास्थळ येवून नुक्सानीची पाहणी केली व पंचनामे केले. दरम्यान गत वर्षी झालेल्या अशाच अवकाळी पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले होते. वर्षभरा नंतर देखील शासनाने त्या लोकांना केली नसल्याने यावेळी तरी ही मदत अति तातडीने देण्याची मागणीमाजी सरपंच राजाराम गव्हाणे यांनी केली आहे. यावेळी माजी सरपंच संपत धोंगडे,जितेंद्र पवार, जयराम गव्हाणे, रामदास बुवा धोंगड़े,तुकाराम धोंगड़े, गंगाराम धोंगड़े, अशोक धोंगड़े,राजाराम धोंगड़े, समाधान धोंगड़े,मोहन धोंगड़े,हरिभाऊ गुळवे,विशाल गव्हाणे, जगन शिंदे, शिवाजी धोंगड़े,कारभारी गव्हाणे, तलाठी सहाय्यक योगेश नाठे,पत्रकार विक्रम पासलकर आदिं सह ग्रामस्थ उपस्थित होते.