Home Blog इगतपुरी मतदारसंघात मतदारांनी केली स्वछ प्रतिमेच्या राजाभाऊ वाजे यांची पाठराखण ; महाविकास आघाडीच्या...

इगतपुरी मतदारसंघात मतदारांनी केली स्वछ प्रतिमेच्या राजाभाऊ वाजे यांची पाठराखण ; महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची एकजुट कामाला

0
622 Post Views

इगतपुरी:विक्रम पासलकर
इगतपुरो/त्रयंबकेश्वर विधानसभा मतदार संघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सलग दोन टर्म मोठ्या मताधिकयाने संधी देवून देखील त्यांच्या बद्दल ची नागरिकांमध्ये तयार झालेली नाराजी आणि दुसरीकडे दोन्हीही तालुक्यातील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची एकदिलाने तयार झालेली वज्रमुठ स्वच्छ प्रतिमेच्या निष्कलंक म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पारडयात मतांचे भरभरून दान मिळवून तयांची पाठराखण करण्यास कारणीभूत ठरली आहे.

यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीत हाच फॅक्टर जर वापरला गेला तर पुढचा आमदार देखील आघाडीचाच असेल मात्र तो कॉंग्रेस की (उबाठा) गट याचे कोड़े स्थानिक नेत्यांना प्रथम सोड़वावे लागेल असे एकंदर चित्र यावेळच्या लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे. दरम्यान येत्या 26 जून रोजी होणा-या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी साठी महाविकास आघाडी व उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार अड़ संदीप गोपाळराव गुळवे यांचे साठी वाजे यांचा विजय एक जमेची बाजू ठरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या गरम वातावरणात च नाशिक शिक्षक मतदार संघावर उद्धव ठाकरे यांचा झेंडा या निमित्ताने रोवला जाण्या साठी कार्यकर्ते व शिक्षक वृंद सरसावले आहेत.
इगतपुरी विधानसभा मतदार संघात (त्रयंबक तालुक्यासह) उबाठा सेना आणि महाविकास आघाडी चे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना तब्बल 1 लाख 1 हजार 585 इतके मतदान झाले आहे. तर शिंदे शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांना मात्र 58 हजार 52 मतांवर च समाधान मानावे लागले. म्हणजे वाजे यांना 43 हजार 533 मतांची आघाडी मिळाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत गोडसे यांना 68 हजार 970 मते मिळाली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्टय म्हणजे नागरिकांनी निवणुकीची कमान आपल्या हाती घेतल्याचे दिसून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील अशीच परिस्थिति तयार झाली होती त्याचे रूपांतर मतांची टक्केवारी वाढून हिरामण खोंसकर यांना तब्बल 89 हजार मते पडली होती. विशेष म्हणजे ज्या वेळी नागरिक निवडणुका आपल्या हाती घेतात त्या त्या वेळी प्रस्थापित सत्ताधारी नेस्तनाभूत झाल्याचे दिसून आले आहे. दिंडोरी त हेच बघायला मिळाले म्हणून सर्वसामान्य कुटुंबातले प्रा भास्कर भगरे सर केंद्रीय मंत्रयाला पाडुन खासदार झाले आहे.
आपला हक्काचा माणूस खासदार झाला पाहिजे म्हणून सिन्नर तालुका अक्षरशः महीनाभर झोपला नाही.विविध जाती धर्माच्या नागरिकांनी वाजेंच्या पारडयात मतदान टाकले आणि तब्बल 1 लाख 59 हजार 492 इतके विक्रमी मतदान त्यांना झाले. सिन्नर आणि इगतपुरी करांचे योगदान वाजेंच्या विजयात मोलाचे ठरले आहे.
इगतपुरीचे मविप्र संचालक आणि महाविकास आघाडी चे नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अड़ संदीप गुळवे,आमदार हिरामण खोंसकर ,माजी आमदार आणि उबाठा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित, जेष्ठ नेते संपतराव सकाळे, लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव,रमेश गावित, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, नईम खान,तालुका प्रमुख राजेंद्र नाठे,त्रयंबकेश्वर तालुका प्रमुख समाधान बोडके, माजी तालुका प्रमुख भगवान आडोळे, माजी सभापती कचरू डुकरे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, जेष्ठ नेते पांडुरंग मामा शिंदे, माजी सभापती कचरू पाटील शिंदे,राजाराम धोंगड़े, उपसभापती शिवाजी शिरसाठ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव उमेश खातळे, युवक कॉंग्रेस प्रदेश चिटणीस भास्कर गुंजाळ, जयराम धांडे, गोपाळ लहंगे,अशोक सुरुडे,मोहन भोर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश धांडे,कारभारी नाठे, रतन जाधव, गणेश टोचे, अर्जुन भोर,नामदेव भगत, निवृत्ती लांबे,विनायक माळेकर आदी विविध नेत्यांमुळे आणि हजारो त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमुळे वाजे यांचे मताधिक्य वाढले.
दुसरीकडे हेमंत गोडसे यांची कमान हाती घेतलेले माजी आमदार काशिनाथ मेंगाळ व त्यांची टीम गोडसे यांचे मताधिक्य वाढविण्यास कमी पडली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काशिनाथ मेंगाळ यांना सोपी नाही असे दिसते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version