839 Post Views
नाशिक शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी बुधवारी ( दि.५ ) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे निवडणुकीत नवीन ट्वीस्ट तयार झाला आहे.शिक्षकांच्या समस्या अन विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती रतन चावला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना दिली. दरम्यान चावला यांच्या उमेदवारीमुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत रंगत वाढणार असल्याची चर्चा केली जाते आहे.
विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे रतन चावला यांनी शिष्टमंडळाच्या उपस्थित अर्ज दाखल केला.याप्रसंगी अनिल ज्ञानचंदानी, नवीन गुरुनानी, हिरो रिजवाणी, टिकम केवलानी, जयराम चावला, मनोहर माखिजा, एडवोकेट. बाळासाहेब आडके, नरेश कुकरेजा, विक्रम पवार,हरिष देवयानी,कन्हैयालाल माखिजा, सेवक दर्डा, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, बन्सीलाल गाडीलोहार ,सिमरन चावला, शितल महरोलिया,गौरव अमेसर, पोपट फोकणे, हिना खान, सोपान कांगणे, जयश्री शिंदे, जयश्री वाजे, रुपाली पवार,राजश्री मोजाड,राम धोंगडे,रविना जनसागर, भाग्यश्री हिरो, ज्योती कोकणे, प्रियंका आहूजा, दिपाली जाधव, रूपाली जाधव, शिल्पा आहेर, शिल्पा कोचरमुथा, शिल्पा भोसले, सरला गाडीलोहार, स्नेहल आहिरवार, सचिन मुठाळ, भाऊसाहेब धनदाट,सागर घोरपडे, राहुल ससाणे आदि उपस्थित होते.