489 Post Views
नाशिक रोड
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर केलेल्या आंदोलन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने नाशिक रोड येथील आंबेडकर पुतळा येथे आव्हाड यांच्या विरोधात घोषणा बाजी करीत प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
आव्हाड यांची प्रतिमा घंटागाडी मध्ये टाकण्यात आली. मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, माधुरी पालवे, सुरेखा निकम, दिनकर आढाव, सुनिल आडके, पंडित आवारे, बाजीराव भागवत, अंबादास पगारे, शरद मोरे, सचिन हांडगे,निवृत्ती भोर, बापु सापुते, राजेश आढाव, नवनाथ ढगे, विशाल पगार, ऋषिकेश घोडके, किरण मईड, विजय उदांवत, विकास पगारे, विजु लोखंडे, भावना नारद,सतिष निकम, कृष्णा सोनवणे, शरद आढाव, पुनित काकंरिया, गणेश सातभाई, शंकर साडे, नितीन पाटील, केतन बोराडे, ओमकार लभडे, दयानंद सदाफुले, रामदास गांगुर्डे, सचिन शेजवळ आदी उपस्थित होते.