418 Post Views
जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विदयार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले . त्याचप्रमाणे दरवर्षीच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे . शाळेचा निकाल १००% लागला आहे. कु.अनुष्का मधुकर गायकवाड हिने ९१.२०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

त्याचप्रमाणे कु. दिवेकर कार्तिकी दिपक हिने ८७.४०% गुण मिळवून द्वितीय तर कु. अस्वले सिद्धी अविनाश हिने ८६.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.पल्लवी विशाल गाडेकर, उपाध्यक्षा सौ.मनीषा वझरे, सचिव सौ.जयश्री योगेश गाडेकर, संस्थेचे कार्यकारी प्रमुख श्री.योगेश लक्ष्मण गाडेकर, श्री.विशाल लक्ष्मण गाडेकर तसेच मुख्याध्यापिका सौ.सरला खैरनार, उपमुख्याध्यापिका सौ.अंजली घोलप, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थी घडविण्याची परंपरा कायम : योगेश गाडेकर
जिजामाता महिला शिक्षण प्रसारक आणि साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थी घडविणे हेच आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे. भविष्यात देखील आमच्या यशाची उज्वल परंपरा कायम राहील असा आत्मविश्वास आहे.