Home Blog ॲक्टिव सोशल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद साखरे यांनी आयोजित केलेल्या  बुद्ध पौर्णिमेच्या...

ॲक्टिव सोशल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद साखरे यांनी आयोजित केलेल्या  बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
251 Post Views

नाशिकरोड :  येथील ॲक्टिव सोशल संस्थेच्या वतीने बुद्धपौर्णिमेनिमित सामुदायिक बुद्धवंदना घेवून ख़िरदान करण्यात आले. तसेच भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष प्रमोद साखरे यांनी केले. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली साखरे यांनी केले. बौद्धाचार्य विनोद शिंदे यानी विधि संचलन आणि सूत्र संचालन केले. माधव लोखंडे यानी आभार मानले .माजी नगरसेवक अशोक सातभाई, राजेश आढाव यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रा. अरुण घोडेराव, सुभाष राउत, नितिन पंडित, अनिरुद्ध शिरसाठ, संगीता बोढ़ारे, रंजना मोरे, चंद्रकला गांगुर्दे, आदिनी बौद्ध पौर्णिमा महत्व विशद करुण मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी अनिल काळे, सागर भोजने,विनायक पगारे विश्वजीत शहाणे, उमेश शिंदे, शिवा गाड़े, योगेश कपिले, अन्ना भगत, प्रवीण वराडे शरद आढाव, विक्रम पोरजे, हेमन्त कांबले, विशाल पगार, रोहन भालेराव, राजनंदिनी आहिरे, जयश्री गुंजाळ, मंगला बोढ़ारे, माधवी शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सुशिल डावरे, निशांत गांगुर्डे,पारस रूपवते, विशाल साखरे, राकेश पगारे, प्रणाली गरुड़, सीमा शिरसाठ, मानसी कदम, ज्योति घायतडक, समीक्षा गांगूर्डे आदिनी परिश्रम घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version