Home Blog पन्नास ( ५० )   खोक्यावाल्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश...

पन्नास ( ५० )   खोक्यावाल्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश देण्यास नाशिकच्या जिल्हा अन तालुका पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध 

1
334 Post Views

नाशिक जिल्ह्यातील  अजित दादा पवार गटाचे काही  आमदार स्वगृही म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या बरोबर येण्यास इच्छुक आहे.अशी चर्चा सध्या जिल्हाभरात सुरु आहे. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा  खोक्यावाल्या   आमदारांना तसेच पदाधिकाऱ्यांना  विरोध आहे. आम्ही एकाही आमदाराला पुन्हा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये  प्रवेश करून देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करण्याची वेळ आली तरी चालेल,असा निर्धार पवार  गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे केला आहे.

नाशिक जिल्ह्यातला एकही आमदाराचा कमबॅक आम्हाला चालणार   नसल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सिबीएस येथील कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशकार्यध्यक्ष पुरुषोत्तम कडलग जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी याच्या प्रमुख उपस्थितीत पार  पडलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत गद्दार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देऊ नये असा महत्त्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 बैठकीत काय घडले वाचा  

नाशिक जिल्ह्यातील जे आमदार, पदाधिकारी  पवार साहेबांना सोडून गेले,  संकटाच्या काळात  शरदचंद्र पवार साहेबांना वयाच्या ८४ व्या वर्षी दु:ख दिले, सोडून गेलेल्या  आमदारांना टक्केवारीचा विकास आठवला, परंतु  पवार साहेब जेव्हा एकटे पडले होते, त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची आवश्यकता होती, त्यावेळी त्यांनी पवार साहेबांवर टीका केली, त्यावेळी केवळ  सर्वसामान्य कार्यकर्ता शरद पवार यांच्या सोबत खंबीरपणे  उभा होता. त्यावेळी गद्दार आमदारांना केवळ 50 खोके दिसत होते. त्यामुळे  आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे सांगू इच्छितो की, कितीही मोठा नेता असला म्हणजे  आमदार असेल मंत्री असेल परंतु जे वाईट काळत आमच्या सोबत नसेल त्यास पुन्हा पक्षात घेण्यासाठी आम्ही विरोध करणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांनी बैठकीत दिला. याप्रसंगी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी शाहु शिंदे,किरण भुसारे, दिनेश धात्रक, गोरख ढोकणे, जिल्हा अध्यक्ष शाम हिरे,तालुकाध्यक्ष किरण कातोरे, विष्णू थेटे, संदिप शेळके, रविंद्र जाधव, राहुल उगले , संदीप शिंदे, भुषण शिंदे, दत्तात्रय वाकचौरे,आदी उपस्थित होते.

1 COMMENT

  1. नाशिक बातमीदार न्यूज हा चैनल नवीन सुरू झाल्याबद्दल श्री उमेश देशमुख यांचे अभिनंदन तसेच पुढील भावी वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version