Home देश- विदेश चलती रहे जिंदगी ‘ या स्व.किशोरकुमार यांच्या हिंदी  गाण्यांवर आधारित सदाबहार गीतांचा...

चलती रहे जिंदगी ‘ या स्व.किशोरकुमार यांच्या हिंदी  गाण्यांवर आधारित सदाबहार गीतांचा कार्यक्रम उत्साहात

0
203 Post Views

 “जीना क्या अजी प्यार बिना, ये मौसम आया है कितने सालोमे , एक रोज मैं तडपकर, रोते हुवे आते है सब , ये क्या हुवा कैसे हुवा, मेरा जीवन कुछ काम ना आया, क्या यही प्यार है, आज रपट जाये तो हमे ना, जहाँ चार यार मिल जाये, दिलबर मेरे कबतक मुझे, जिंदगी का सफर है ये कैसा सफर , ” अशी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर हिंदी गाणी रम्य सायंकाळी गायकांनी सादर करून रसिकांची मने जिंकली .

निमित्त होते ते ‘ आशा मेलोडी मेकर्स ‘ नाशिकरोड येथील अमरकुमार प्रस्तुत ‘ चलती रहे जिंदगी ‘ या स्व.किशोरकुमार यांच्या हिंदी कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित सदाबहार गीतांचे गुरुवार दि.२३ मे २०२४ रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह , नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते . या गाण्यांच्या कार्यक्रमाचे संयोजन अमरकुमार यांनी केले . स्वतः गायक अमरकुमार यासह संजय परमसागर,संजय रासकर, जगन चव्हाण, गॉडविन लुईस, शाम शहाणे,नेहा आहेर , अनिल पांचाळ यांनी गायक किशोरकुमार यांची विविध गाजलेली सोलो, डुएट हिंदी गाणी सादर केली . याप्रसंगी नंदकुमार देशपांडे, ए एन.कराओकेचे नितीनकुमार, घनशाम पटेल , अजय पाटील, संजय डेरे, ज्ञानेश्वर चौधरी, दत्ताजी कदम, अनिल पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.ध्वनी व्यवस्था कैलास काळे यांनी तर सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी केले . गायकांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित सर्व अतिथी व हॉलमध्ये खचाखच भरलेल्या रसिक श्रोत्यांनी उस्फूर्त दाद देऊन मैफिलीचा आनंद घेतला .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version