Home देश- विदेश महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित ; ...

महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित ;  भाजपचे शहर उपाध्यक्ष राजेश आढाव यांची माहिती

0
182 Post Views

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात विकास कामे केली आहेत. केंद्र शासनाच्या नवीन योजना मतदारसंघात राबविलेल्या आहे. तसेच गोरगरीब आणि पिडीत जनतेसाठी सतत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावर मतदार पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे उपाध्यक्ष राजेश आढाव यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील तत्कालीन खासदार गो. ह. देशपांडे यांच्या नंतर सलग दोन वेळा निवडून येण्याची संधी खासदार हेमंत गोडसे यांना मतदारांनी दिली. संधीचे सोने करण्याचा प्रयत्न खासदार हेमंत गोडसे यांनी केला. जनतेच्या मनात भरावीत अशी कामे केली. दहा वर्ष ते जनतेच्या संपर्कात राहिले. जनतेला भेडसावणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला. नाशिक लोकसभा मतदार संघात नाशिक पूर्व,नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, इगतपुरी – त्रंबकेश्वर, देवळाली आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

यापैकी कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणकोणत्या योजनांची आवश्यकता आहे. याची अचूक माहिती त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात एकसारख्या योजना राबवून विकास कामे केली. जनतेच्या मनात भरणारी अशी त्यांची कामे आहे. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो असल्याचे भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे उपाध्यक्ष राजेश आढाव यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version