Home देश- विदेश राजाभाऊ वाजे यांचा लाखोंच्या मताधिक्याने दणदणीत विजय होणार ; उबाठाच्या युवती सेनेच्या...

राजाभाऊ वाजे यांचा लाखोंच्या मताधिक्याने दणदणीत विजय होणार ; उबाठाच्या युवती सेनेच्या नेत्या योगिता गायकवाड यांची माहिती

0
304 Post Views

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निवडणुकी दरम्यान मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. तसेच महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संघटित होऊन राजाभाऊ वाजे यांचा एकदिलाने प्रचार केलेला आहे. या पार्श्वभूमीवर राजाभाऊ वाजे यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी निश्चित असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे युवती शिवसेनेच्या नेत्या योगिता गायकवाड यांनी दिली.

निवडणूक प्रचार दरम्यान राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचा मोठा झंजावात पाहायला मिळत होता. नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये राजाभाऊ वाजे यांना स्वतःहून मतदार साद घालत असल्याचे चित्र होते. राजाभाऊ वाजे यांच्या नकळत अनेक मतदारांनी स्वतःहून प्रचार केलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत राजाभाऊ वाजे हे निवडून यावे यासाठी सर्वजण स्व:खुशीने प्रचार करीत होते. यंदाच्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांना दिल्लीला पाठवायचेच, असा निर्धार नाशिकच्या जनतेने केलेला दिसतो आहे.

त्यामुळे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार रॅलीला, प्रचार सभेला तसेच बाईक रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. विरोधकांनी कितीही दावा, कांगावा केला तरी राजाभाऊ वाजे यांचा विजय अटळ आहे, असा आत्मविश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे युवती शिवसेनेच्या नेत्या योगिता गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. आपण स्वतः महिला सहकाऱ्यांसोबत नाशिक रोड परिसरातील घराघरात प्रत्यक्ष भेट देऊन राजाभाऊ यांचा प्रचार केला. महिलांना संघटित करून राजेभाऊ वाजे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. नाशिक लोकसभा मतदारसंघात राजेभाऊ वाजे हेच खासदार का व्हावेत, याविषयी महिलांमध्ये जागृती निर्माण केली. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता राजाभाऊ वाजे यांचा लाखोंच्या मताधिक्याने निश्चितपणे विजय होईल, असा पुनरुच्चार उबाठाच्या युवा नेत्या योगिता गायकवाड यांनी केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version