Home Blog १४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठक...

१४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बैठक ! ; कृती समितीच्या राज्यव्यापी आंदोलनाची दखल

0
12 Post Views

नाशिक : उमेश देशमुख 

महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती तर्फे शिक्षकेतर सेवकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची अखेर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दखल घेतली. गुरवारी मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १४ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा बैठक आयोजित करुन मागण्या मार्गी लावण्यावर शिक्कामोर्तब झाला. यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला योग्य दिशा मिळाली असून लवकरच यश मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.

कृती समितीने ५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे संचालक, उच्च शिक्षण विभाग यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यावेळी संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन मोर्चाला संबोधित करताना दिले होते. त्याप्रमाणे गुरुवारी मंत्रालयात ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांवर विचार विनिमय झाला.

पुढील अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत पुन्हा एकदा बैठक घेण्याचा निर्णय झाला.त्यानुसार १४ डिसेंबर रोजी ही बैठक निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लक्ष मुख्यमंत्री फडणवीस, ना. चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या संयुक्त बैठकीकडे लागले आहे.

दरम्यान एकीकडे कृतीसमीची ना.चंद्रकांत दादा यांच्या सोबत बैठक सुरू असताना राज्यभरातीला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दिवसभर कामबंद आंदोलन सुरू होते.

या मागण्यांवर होणार चर्चा

१ सातव्या वेतन आयोगानुसार १०, २०, ३० वर्षाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी.२ जुनी पेन्शन योजना लागू करणे.३ अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा.४ रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी. ५ गोंडवाना विद्यापीठासाठी स्वतंत्र सहसंचालक ( उच्च शिक्षण ) कार्यालय स्थापन करणे. ६ महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर यांना कालबद्ध पदोन्नती ४००० – ६००० ही वेतनश्रेणी लागू करावी.७ वर्ग ३ मधील सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती मर्यादेचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे करणे.८ शिक्षकेत्तर सेवकांची उपदान रक्कम वाढवावी.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version