Home Blog मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचा शब्द मिळताच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ! ; दिवाळीनंतर मंत्रालयात...

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचा शब्द मिळताच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ! ; दिवाळीनंतर मंत्रालयात होणार मागण्यांवर चर्चा,पुण्यातील धडक मोर्चाला यश

0
551 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख 

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ५) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते उच्च शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.या आश्वासनानंतर कृती समितीने तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून सकाळी ११:३० वाजता राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली. मोर्चा शांततेत व वाहतूककोंडीला कोणताही अडसर न होता संचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आला. मोर्चातील घोषणांमुळे परिसर दणाणून गेला.प्रवेशद्वाराजवळ आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडविले. कृती समितीच्या केवळ ठराविक पदाधिकाऱ्यांना संचालक डॉ. देवळाणकर यांना चर्चेसाठी बोलावले. एकीकडे शिष्टमंडळ चर्चेत असताना दुसरीकडे प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू ठेवली. बाहेर या बाहेर या…, संचालक डॉ.देवळाणकर सर बाहेर या…, अश्या घोषणाबाजीने संचालक कार्यालय दणाणून गेले. अखेर संचालक डॉ. देवळाणकर यांनी बाहेर येत मोर्चाला संबोधित केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती देऊन आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी कृती समितीचे अजय बळवंत देशमुख, रावसाहेब त्रिभुवन, प्रकाश म्हसे, मिलिंद भोसले, दिनेश दखणे, संदीप हिवरकर,आनंद खामकर,दिलीप उपासे, माधव राऊळ, जी. वाय. पाटील, मनोहर राजपुत, संतोष मदने, सतीश वाघमारे, डॉ. सुनिल धिवार,अशोक रानवडे, बाळासाहेब आंत्रे, सुमित ढोरे, गोपाल सोनवणे, मारोती.धोतरे, विजय घरत, प्रविण पाटील, विलास. संमनेरे, उमेश देशमुख, कटारे मालेगावकर संतोष कानडे भिमा म्हसके, रामदास डेर्ले, एकनाथ ददेल आदी. राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा 

१ सातव्या वेतन आयोगानुसार १०, २०, ३० वर्षाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी.

२ जुनी पेन्शन योजना लागू करणे.

३ अकृषी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा.

४ रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी.

५ गोंडवाना विद्यापीठासाठी स्वतंत्र सहसंचालक ( उच्च शिक्षण ) कार्यालय स्थापन करणे.

६ महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर यांना कालबद्ध पदोन्नती ४००० – ६००० ही वेतनश्रेणी लागू करावी.

७ वर्ग ३ मधील सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती मर्यादेचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे.

८ शिक्षकेत्तर सेवकांची उपादान रक्कम वाढवावी.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version