नाशिकरोड : उमेश देशमुख
महाविकास आघाडीतर्फे नाशिक तालुक्यातील शेतकरी, व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांची दखल घेत तत्काळ योग्य ती उपाययोजना करावी. तसेच नाशिक तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाची मदत पीडित शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी, अश्या स्वरूपाची मागणी असणारे निवेदन महसूल विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र वाघ यांना गुरुवारी ( दि. ८ ) देण्यात आले.मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

निवेदनातील आशय असा, नाशिक तालुक्यातील पावसाची परिस्थिती, पिकांचे नुकसान व उपलब्ध पाणीसाठा यांचा तातडीने आढावा घ्यावा,तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सवलती व मदत मिळावी.
शेतमालाचे पंचनामे करावे,पीक विमा व नुकसानभरपाई तातडीने द्यावी.पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तसेच शासनाची नुकसानभरपाई त्वरित द्यावी.
रेल्वे मार्गातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळा
पुणे–नाशिक रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा,बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी व शेतीचे नुकसान कमीत कमी होईल, अशा पद्धतीने मार्गाचा फेरविचार करावा. शेतकऱ्यांच्या हरकती व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
कारखान्याचे थकीत बिले मिळावी
नाशिक सहकारी साखर कारखान्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत. याप्रश्नी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी.शेतीसाठी होणारा विजेचा लपंडाव तातडीने थांबवा, महावितरणकडून शेतीसाठी होणारा अनियमित वीजपुरवठा तातडीने थांबवून शेतकऱ्यांना नियोजित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा.
एसआयआर मतदार पुनर्निरीक्षण रद्द करा
मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी, एसआयआर मतदार पुनर्निरीक्षण पद्धती तातडीने रद्द करावी, एसपीएससी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश म्हस्के,राष्ट्रवादी नाशिक तालुकाध्यक्ष संतोष गायधनी, शिवसेना नाशिक तालुकाध्यक्ष दीपक गायधनी,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष गणेश गायधनी,मनसेचे ईश्वर गायखे,शेकापचे दीपक गायधनी, राष्ट्रवादी देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे,निवृत्ती कापसे, आसाराम शिंदे,यशवंत आगळे, ज्ञानेश्वर पोवळे,सचिन गायधनी, अनिल गायधनी,विलास भालेराव,शिवराम गायधनी, संतोष गाडेकर, गणेश मोरे, शरद ढमाले, हर्षद गायधनी आदी. राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस-मनसे-शेकाप महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.