Home Blog मध्य रेल्वेच्या आसनगाव – कसारा रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक ! ; बातमीत...

मध्य रेल्वेच्या आसनगाव – कसारा रेल्वे मार्गावर पॉवर ब्लॉक ! ; बातमीत वाचा रेल्वे गाड्यांच्या मार्ग अन् वेळेचे बदल 

0
201 Post Views

नाशिकरोड :उमेश देशमुख

मध्य रेल्वे मुंबई विभागा अंतर्गत येणाऱ्या आसनगाव – कसारा तिसऱ्या मार्गाच्या प्रकल्पाचे तसेच कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या कामामुळे कसारा येथे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. १४ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान या मार्गावर धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात व वेळेत बदल केले असल्याची नोंद रेल्वे प्रवाशांनी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या संबंधित गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे आणि झालेल्या बदलांची नोंद घ्यावी.

विस्तारीकरण (इगतपुरी बाजू) या कामांच्या अनुषंगाने ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’, ‘नॉन-इंटरलॉकिंग’ आणि ‘पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंग’ कामांसाठी कसारा येथे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कालावधीतील रेल्वे सेवेवरील परिणाम होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version