Home राजकारण झाले इलेक्शन, जपा रिलेशन ; खासदार हेमंत गोडसे रमले नातवंडासोबत…, राजाभाऊ वाजे...

झाले इलेक्शन, जपा रिलेशन ; खासदार हेमंत गोडसे रमले नातवंडासोबत…, राजाभाऊ वाजे अन गोडसे यांचा जुना व्हायरल फोटो बघा…

0
162 Post Views

निवडणुका म्हटल्या की वाद विवाद , ताणतणाव अन हाणामाऱ्या ठरलेल्याच असतात, राजकीय नेत्यांची अलीकडच्या काळात वाढत चाललेली शिवराळ भाषा अन एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात. सद्या राज्य पातळीवरील महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय नेत्यांनी तर याबाबत केव्हांच सीमोल्लंघन केलेले दिसते. पण याला नाशिक लोकसभा मतदार संघ काही प्रमाणात अपवाद ठरलेला दिसतो.

निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे या दोघांचा एकत्रीत जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्याचप्रमाणे झाले इलेक्शन ,जपा रिलेशन ही पोस्ट देखील व्हायरल झालेली आहे.

या पोष्टला सर्व पक्षीय कार्यकर्ते, सामान्य नागरिकांकडून देखिल दाद मिळत आहे. सोबतच खासदार हेमंत गोडसे यांचे एक छायाचित्र सोशल मिडियात चांगलेच व्हायरल होतांना दिसत आहे.

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबातील नातवंडासोबत ते खेळताना दिसत आहे.मागील एक ते दीड महिन्यापासून उमेदवारी मिळविण्यासाठी झालेला संघर्ष, त्यानंतर प्रचारासाठी फिरतांना झालेली दगदग, यामुळे मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण झालेला आहे. यातून तणावमुक्त अन थोडे वेगळे, शांत वाटावे, यासाठी त्यांनी कुटुंबातील नातवंडाच्या सोबत वेळ घालविण्यास प्राधान्य दिले.


सोशल मीडियात व्हायरल झालेल्या त्यांच्या या छायाचित्राची सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी योग्य ती दखल घ्यायला हवी. आपल्या वरिष्ठ नेत्यांप्रमाणेच त्यांनी देखील राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवायला हवे, वैयक्तिक हितसंबंध जपायला हवे, राजकारणामुळे वैयक्तिक संबधाना तडा जाऊ देऊ नये.”झाले इलेक्शन, जपा रिलेशन” या सोशल मीडिया वरिल व्हायरल पोस्द्वारे दिल्या जाणाऱ्या संदेशातून थोडाफार बोध घ्यायला हवा, तेच सर्वांच्या हिताचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version