Home Blog नाशिक पुणे रोडवरील या भागात शनिवारी वीज पुरवठा बंद राहणार

नाशिक पुणे रोडवरील या भागात शनिवारी वीज पुरवठा बंद राहणार

0
312 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 

नाशिक पुणे महामार्गालगतच्या काही भागात शनिवारी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. उपनगर विद्युत उपकेंद्र अंतर्गत देखभाल व दुरुस्ती तसेच जुने ब्रेकर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठराविक विद्युत वाहीनीवरील विद्युत पुरवठा बंद राहील. याविषयी नोंद वीज ग्राहकांनी घ्यावी,असे आवाहन महावितरण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

या भागात वीज पुरवठा राहणार बंद

११ केंवी गांधी नगर वाहिनीवरील – अभिष नगर,पंचशील नगर,दत्त मंदिर,दीप नगर, विद्युत कॉलनी,सहकार कॉलनी, एन के नगर, एलआयजी सोसायटी, छोटी जनता परिसर, संजय गांधी नगर, टागोर नगर, विजय ममता थिएटर, टाकळी रोड परिसर

११ केव्ही डीजीपी नगर वाहिनीवरील –

टागोर नगर , के के वाघ स्कूल, रेयान इंटरनॅशनल स्कूल, डीजीपी नगर, गणपती मंदिर, इरिगेशन कॉलनी, अशापुरा , औरंगाबाद सोसायटी

११ केव्ही समता नगर वाहिनीवरील –

उपनगर, शांती पार्क, रामदास स्वामी नगर लेन नंबर १,२व,३ खोडदेनगर, साळवे मळा , इंदिरा गांधी झोपडपट्टी, इंद्रायणी सोसायटी , प्रेरणा सोसायटी, जय भवानी नगर , समता नगर, क्षीरसागर मळा, जामकर मळा, शिंदे मळा व शेलार लॉन्स परिसर

दरम्यान देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version