नाशकात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाचे २८ वे महाअधिवेशन
नाशिकरोड : उमेश देशमुख
तांत्रिक कर्मचारी हे महावितरणचे “खरे आधारस्तंभ” असून ते सण-उत्सवात सर्वजण घरात असताना “वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट आणि आपत्कालीन परिस्थितीतही तांत्रिक कर्मचारी अखंड सेवा देत असतात. ग्राहकांना बटन दाबताच वीज मिळते; मात्र त्यामागे लाखो कर्मचाऱ्यांचे कष्ट असतात त्यामुळे या कर्मचाऱ्यांविषयी आम्हाला सार्थ अभिमान आहे, आसे प्रतिपादन महावितरण कंपनीचे मानव संसाधन संचालक रांजेद्र पवार यांनी केले.
नाशिक रोड महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाचे २८ वे महाअधिवेशन मधुरम बॅक्केट हाॅल येथे झाले. त्यावेळी ते बोलत बोलत होते. कार्यक्रमांचे अध्यक्षस्थांनी केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे हे होते. व्यासपिठावर प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक अरविंद भादिकर, संघटनेचे सरचिणटणीस सयय्द जगिरोद्यीन, नगोराव मगर, नाना चट्टे कैलास गौरकर , अजीज पठाण, मजहर पठाण भानुदास शेवाळे , विश्वभमर लोखंडे, महावितरम कंपनीचे अधिकारी रवींद्र खाडे, प्रमोद राजेभोसले, जनसंपर्क अधिकारी विकास आढे,
सुत्रसंचलन प्रिया जैन, संदिप पांचगे यांनी केले. आभार प्रदर्शन चंद्रकांत आहिरे यांनी केले.संयोजक किसन बगड, गिरीश जगताप, विनोद अहिरे, चंद्रकांत अहिरे, विष्णू शिरसाठ, विनायक मगर यांनी केले. राजेंद्र पवार यांनी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य प्रशिक्षम व सुरक्षा विभागाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. साहित्य, सुरक्षा साधने आणि उपकरणे खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, मे अखेरपर्यंत बहुतांश जिल्ह्यांमध्ये साहित्य पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.
महावितरणतर्फे सुरक्षा सप्ताह, वीज सुरक्षा जनजागृती अभियान आणि विद्यार्थी सहभाग कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. यंदा २१ लाख विद्यार्थ्यांपर्यंत वीज सुरक्षा, वीज बचत आणि वीज बिल भरण्याबाबत जनजागृती पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे पवार यांनी सांगितले.बोनस आणि पदोन्नतीवर चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये बोनसबाबत उत्सुकता असून,त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महावितरणची थकबाकी कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले असून, त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले.उपकेंद्र सहाय्यक भरती दीर्घकाळ प्रलंबित असल्याने अनुभवी तांत्रिक कर्मचाऱ्यांना थेट ऑपरेटर पदावर संधी देण्याची मागणी अधिवेशनात करण्यात आली. १५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळावी, अशी मागणी संघटनांनी केली.
कामगार कल्याण निधीअंतर्गत विविध योजना
योजनांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती देताना पवार यांनी शिष्यवृत्ती, वैद्यकीय मदत, क्रीडा पुरस्कार, अपंगत्व सहाय्य, मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, गुणवंत कामगार पुरस्कार आणि कुटुंबीयांसाठी आर्थिक सहाय्य यांसह अनेक योजनांचा उल्लेख केला.कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती वाढविणे, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पाल्यांना प्रोत्साहन, महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा, स्पोर्ट्स क्लब स्थापनेसाठी आर्थिक मदत अशा अनेक योजना जाहीर करण्यात आल्या.
सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर
ऊर्जा बचत आणि स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केल्याची माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांना सोलर प्रकल्पांसाठी व्याजमुक्त आर्थिक सहाय्य देण्यात येत असून, कृषी सौर वाहिनी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सौर प्रकल्प उभारले जात असल्याचे सांगण्यात आले.
महावितरणच्या पुनर्रचना प्रक्रियेबाबत
कर्मचाऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करताना पवार यांनी स्पष्ट केले की, “महावितरणचे खासगीकरण होणार नाही. कृषी आणि बिगर कृषी विभागांची आर्थिक पुनर्रचना केली जात असली तरी कंपनी कर्मचाऱ्यांचीच राहणार आहे.”भविष्यात कर्मचाऱ्यांना कंपनीत सहभाग आणि मालकी हक्क देण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तांत्रिक आणि व्यापारी नुकसान कमी करून शंभर टक्के वसुली साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
एकजुटीनेच प्रश्न मार्गी लागणार
महावितरण वीज तांत्रिक कामगारांच्या अधिवेशनात बोलताना सघटनेच्या पदाधिकारी वक्त्यांनी संघटनेची एकजूट, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे महत्त्व आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी यावर भर दिला. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यात मोठी जबाबदारी
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणसमोर मोठी आव्हाने उभी राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलत्या पॉवर सेक्टरमध्ये भविष्यात स्पर्धा वाढू शकते, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतःला अधिक सक्षम आणि अद्ययावत ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विविझ ठराव मंजुर करण्यात आले. यावेळी अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, उर्जा राज्य मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे ऑनलाइन भाषणे झाली.
