येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या देवळाली कॅम्प शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या हस्ते वैभव पाळदे यांचा सत्कार झाला. याप्रसंगी पुढील राजकीय वाटचालीस पाळदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना दत्ता गायकवाड यांनी सांगितले की, वैभव पाळदे यांना पक्षाचे काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आगामी विधानसभा व इतर निवडणुकीसाठी कामाला सुरुवात करावी, त्याचप्रमाणे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
नवनिर्वाचित देवळाली शहर उभाठाचे संघटक वैभव पाळदे यांनी देवळाली कॅम्प परिसरात अनेक समस्या आहेत, सामान्य नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आपण स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन काम करणार आहोत. माझ्यावर टाकलेली जबाबदारी अन विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असणार आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक दिनकर पाळदे, जेलरोड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर आढाव, कुलदीप आढाव आदी. उपस्थित होते.