Home Blog शिंदे टोलनाक्यावर एसटीची सोलापूर – नाशिक बस जळून खाक ; चालकाच्या सतर्कतेमुळे...

शिंदे टोलनाक्यावर एसटीची सोलापूर – नाशिक बस जळून खाक ; चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व १५ प्रवासी सुखरूप ! Vido

0
305 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 

नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावर शुक्रवारी दुपारी ५.५० वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूरहून नाशिक कडे येणाऱ्या नाशिक डेपोच्या धावत्या बसला अचानक टोलनाक्यावर आग लागल्याची घटना घडली.आग लागल्याचे चालक विलास चोले याच्या लक्षात येताच प्रसंग आवधान राखत बस मधील प्रवाशी चालक वाहकांनी सुखरूप बाहेर काढले. या आगीने धुराचे लोळची लोळ आकाशात दिसत होते. घटनेमुळे काही काळ परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व १५ प्रवासी सुरक्षित बाहेर पडले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी बस सोलापूरहून नाशिक कडे पुढील मार्गावर प्रवास करत असताना शिंदे टोलनाक्यावरच्या अचानक बसच्या इंजिनच्या पुढील भागातून धूर निघू लागला. परिस्थिती लक्षात येताच चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणांतच बसने मोठा पेट घेतल्याने आगीने भीषण रुद्ररूप धारण केले होते. नाशिक पुणा महामार्गावरील शिंदे पळसे भागातील महामंडळाची बस पेटल्याची ही दुसरी घटना आहे. मागील दोन तीन वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे एसटी महामंडळाच्या बसच्या इंजिन मधे अचानक आग लागली होती. या कालच्या घटनेने पळसे जवळील घटनेसह मिर्ची हाँटेल नाशिक मधील बस पेटल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळाने ज्या नादुरुस्त अथवा खराब बस आहेत. त्या व्यवस्थित दुरुस्त करुनच रस्त्यावर प्रवासी वाहतूकीसाठी सोडायला हव्या आहेत. आज अधिक वातावरणात उष्णता असल्याने कधाचीत बसच्या इंजिन मधे शाँर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचे बोलले जात आहे.

अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व वाहतूक शाखेचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते.बसला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

टोलवेज कंपनीकडून सुविधाचा अभाव.

नाशिक-सिन्नर टोलवेज कंपनी केवळ टोलवसुलीत मग्न असुन फक्त वाहनधारकांचे अधिकचे आर्थिक सोसनच कंपनी करते की काय अशी चर्चा सध्या नागरिकांन मधे असुन अशा काही आगीच्या घटना भविष्यात घडू नये मात्र अचानक घडली तर साधे आग विझविण्यासाठी पूरक पाण्याचे बंब देखील टोल व्यवस्थापनाकडे नसावे ही गांभीर्याचीबाब असुन केवळ टोलवसुली ऐवढे एकच टारगेट असेल व वाहनधारकांची कोणतीही काळजी नसेल तर संबधीत टोलप्रशासनावरती कारवाई का होत नाही ? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असुन संबधीत स्थानिक सरकारी अधिका-यांची काही मिली भगत आहे का ? हा प्रश्न उभा राहतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version