Home Blog एक हजार मीटर लांबीची तांब्याची केबल चोरणारे आरोपी नऊ लाखांच्या मुद्देमालासह पोलिसांच्या...

एक हजार मीटर लांबीची तांब्याची केबल चोरणारे आरोपी नऊ लाखांच्या मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात ! गुन्हे शोध पथकाची कारवाई

0
14 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

ट्रक मधुन चोरीस गेलेली नऊ लाख रूपये किमतीची एक हजार मिटर लांबीची तांब्याची तार गुन्हे शोध पथकाने संशयित आरोपींसह ताब्यात घेतली. बारा कोर केबल असणाऱ्या तांब्याच्या नऊ लाख रुपये मूल्य आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत कार्यवाही केली. त्यामुळे गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, २२ फेब्रुवारी पहाटे चार वाजेचे सुमारास नागपुर वरून नाशिकरोड रेल्वे-साठी डिलेवरी साठी १४ केबल बंडलनी भरलेला ट्रक ( एम.एच. ०४ एम एच ४७४३ ) सिन्नर फाटा जवळ नाशिक पुणे रोड येथील उड्डाण पुलाच्या रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी त्यातील नऊ लाख रू किमतीचा एक केबल बंडलचा ड्रम अंदाजे एक हजार मिटर लांबीची काळया रंगाची केबल ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरल्याचे निदर्शनास आले. तशी फिर्यादी चालक पंकज गौतम मेश्राम ( शिवलकर नगर, खरवी रोड, नागपूर ) यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे दाखल केली. सदर गुन्हयाचा तपास पोहवा विशाल पाटील करीत होते.

नागपूर रेल्वेची केबल

गुन्हयातील केबल नागपुर रेल्वेची असुन शासकीय मालमत्ता असल्याने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, किशोर काळे, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग श्रीमती संगिता निकम, यांनी गुन्हा उघडीकीस आणण्या बाबत आदेश दिले.

नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सो, पोनि बडेसाहेब नाईकवडे (गुन्हे) गुन्हेशोध पथकाचे अधिकारी सपोनि प्रविण सुर्यवंशी यांनी गुन्हेशोधपथकातील अमंलदार यांना वरील गुन्हयातील गेला माल व अज्ञात आरोपी यांचा शोध घेवुन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस करण्याविषयी मार्गदर्शन केले.

गुप्त माहितीच्या आधारे तपास

सदर गुन्हा घडला त्या परिसरात काहीएक सुगावा तसेच सीसीटीव्ही फुटेज मिळुन येत नव्हते. दि. २४/०२/२०२६ रोजी पोहवा/विशाल पाटील यांना गोपनीय माहीती मिळाली की, संशयीत आरोपी १) तारासिंग चरणसिंग शिकलकर वय १९ वर्षे, रा. ठि. शिकलकरी वस्ती, सिन्नर फाटा, नाशिकरोड, नाशिक २) यसुसिंग मनुसिंग शिकलकर वय १८ वर्षे, रा. ठि. शिकलकरी वरती, सिन्नर फाटा, नाशिकरोड, नाशिक यांनी सदर केबल बंडल चोरी केली असल्यांची खात्रीशिर माहीती मिळाली.त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोहवा/सागर आडणे, पोशि/महेंद्र जाधव, फेशि/अरून गाडेकर, पोशि/रोहीत शिंदे, पोशि/योगेश रानडे यांचे सह सिन्नरफाटा परिसरात सापळा रचुन त्यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.

उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, किशोर काळे, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग श्रीमती संगिता निकम, याचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेद्र सपकाळे,बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि प्रविणसुर्यवंशी, तसेच गुन्हेशोध पथकाचे पोहवा विशाल पाटील, पोहवा सागर आडणे , पोशि महेंद्र जाधव, पोशि अरून गाडेकर, पोशि रोहीत शिंदे, पोशि योगेश रानडे आदींनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version