Home Blog साधना एज्युकेशनचे घवघवीत यश ; पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत विभागस्तरावर नऊ खेळाडूंची निवड

साधना एज्युकेशनचे घवघवीत यश ; पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत विभागस्तरावर नऊ खेळाडूंची निवड

0
99 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

तपोवन येथील सी ४ जिममध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये नाशिक रोड येथील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. शाळेच्या नऊ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे त्यांची विभागस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.

या ऐतिहासिक यशामागे संस्थेच्या संपूर्ण व्यवस्थापन मंडळाचे पाठबळ महत्त्वाचे मानले जाते. दूरदृष्टीचे आणि सक्रिय सहभागामुळे हे यश मिळाले. आहे संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहनाचे वातावरण तयार करून दिले. केवळ शिक्षणच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी चमक दाखविण्याची संधी उपलब्ध करून दिली. समोर सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवले. सचिव जयश्री गाडेकर यांनी कठोर मेहनत घेत प्रशासकीय मार्गदर्शन केले. तसेच खेळाडूंना आवश्यक असणारी सक्षम आधारव्यवस्था आणि मानसिक बळ पुरवले.

संस्थेचे विश्वस्त योगेश गाडेकर सरांनी विद्यार्थ्यांना कसून तयारी करता यावी यासाठी आवश्यक त्या अद्ययावत सुविधा आणि पायाभूत सुविधा वेळेवर उपलब्ध करून दिल्या.
मार्गदर्शन आणि नेतृत्व मुख्याध्यापिका सरला खैरनार यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्र या दोहोंचा समतोल राखत प्रेरणादायी नेतृत्वाची भूमिका निभावली. तर मुख्याध्यापिका अंजली घोलप यांनी शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले. यशाचे श्रेय तज्ज्ञ मार्गदर्शन देणारे क्रीडाशिक्षक विनय खैरनार सर यांनाही दिले जात आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. साधना एज्युकेशन परिवारातर्फे पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या प्रशिक्षकांचे आणि व्यवस्थापन मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

विजेत्या खेळाडूंची नावे अशी

१७ वर्षांखालील मुले (नाशिक मनपा):बीओम मोहन मापारी: ५३ किलो वजन गट रेहान रफिक शेख: ९३ किलो वजन गट
आर्यन विष्णू घुगे: १०५ किलो वजन गट १७ वर्षांखालील मुली (नाशिक मनपा): अनुष्का सचिन निरभवणे: ४३ किलो वजन गट प्राप्ती परशुराम सांगळे: ४७ किलो वजन गट
१९ वर्षांखालील मुली (नाशिक मनपा): पलक रमेश शेडगे: ४३ किलो वजन गट दिव्या जयवंत शिरसाठ: ६३ किलो वजन गट लक्ष्मी सुनील फिरके: ६९ किलो वजन गट जान्हवी निलेश बोराडे: ७६ किलो वजन गट

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version