Home Blog भुजबळ सोमवारी नाशिकमध्ये घेऊन येणार स्व.अजितदादा यांचा अस्थिकलश ! ; येवल्यात सकाळी,...

भुजबळ सोमवारी नाशिकमध्ये घेऊन येणार स्व.अजितदादा यांचा अस्थिकलश ! ; येवल्यात सकाळी, नाशकात दुपारी शोकसभा

0
303 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख  

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात दु:खद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या दि.२ फेब्रुवारी २०२६ रोजी येवला व नाशिक येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सोबत घेऊन येणार आहे. हा अस्थिकलश येवला व नाशिक येथील शोकसभेच्या स्थळी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता येवला शहरातील माऊली लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस स्व.अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या शोकसभेस प्रमुख मंत्री, खासदार, आमदार व विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या शोकसभेत स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व सर्व नागरिकांनी या शोकसभेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version