Home Blog मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा ! ; वन विभागाच्या माधवी...

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा ! ; वन विभागाच्या माधवी मनोहर जाधव यांची मागणी vidio बघा….

0
488 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित आयोजित कार्यक्रमातील भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अशी मागणी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या वन विभागातील महिला कर्मचाऱ्याने करून जाहीर निषेध नोंदविला. यासंदर्भात सोशल मीडियावर महिलेचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून महिला कर्मचारी सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसते आहे.

सोमवारी ( दि.२६ ) नाशिक शहरात झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी ही घटना घडली. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. मानवंदनेचा कार्यक्रम झाला.यानंतर मंत्री महाजन यांचे भाषण सुरू झाले.भाषणाच्या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील महिला कर्मचारी माधवी मनोहर जाधव यांनी महाजन यांचा निषेध नोंदविला. त्या म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेले आहे.

त्यांच्या संविधानामुळे आज आपण सर्वजण सुखरूप आहे. परंतु आज प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे नाव आपल्या भाषणात घेणे अपेक्षित होते. परंतु तसे त्यांनी केले नाही. हेतू पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले गेले नाही.त्यांना कमी लेखण्याचा आणि त्यांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रकार आहे. असा जाहीर आरोप या महिला अधिकाऱ्याने केला.अचानक झालेल्या या प्रकारामुळे येथील पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. उपस्थित महिला पोलिसांनी वनविभागाच्या माधवी जाधव यांना कार्यक्रम स्थळावरून हलविले. यादरम्यानप्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी माधवी जाधव यांचा व्हिडिओ चित्रित केला तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. त्यामुळे महाजन यांच्या हस्ते पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाची शहरात सर्वत्र चर्चा सुरू झाली.

माधवी जाधव म्हणतात…

माधवी जाधव या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सेवेत आहे. सोमवारी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या उपस्थित होत्या. गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे हेतू पुरस्कार टाळले.वास्तविक त्यांनी त्यांचे नाव घ्यायला हवे होते. त्यामुळे मी त्यांचा निषेध करीत आहे. महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अशी या निमित्ताने मी मागणी करीत आहे.असे माधवी जाधव यांनी म्हटले.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version