Home Blog नाशिकच्या महिला महापौर निवडीकडे लक्ष ! ; हीमगैरी आडके,दिपाली कुलकर्णी , दिपाली...

नाशिकच्या महिला महापौर निवडीकडे लक्ष ! ; हीमगैरी आडके,दिपाली कुलकर्णी , दिपाली गीते, स्वाती भामरे आदींची नावे चर्चेत

0
509 Post Views

नाशिक : उमेश देशमुख

नाशिक महापालिकेची निवडणूक नुकतीच मोठ्या धामधुमीत पार पडली. १२२ पैकी ७२ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे नाशिकचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार यात तीळ मात्र शंका नाही. गुरुवारी ( दि.२२ ) महिला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी नाशिकचे महापौर पदाचे आरक्षण निश्चित झाले. त्यामुळे आता नाशिकचा महापौर महिलाच होणार आहे.

भाजपतर्फे हिमगौरी आडके,रोहिणी पिंगळे,स्वाती भामरे,माधुरी बोलकर, दिपाली सचिन कुलकर्णी,संध्या अभिजीत कुलकर्णी,प्रतिभा बाळासाहेब पवार,डॉ. योगिता अपूर्व हिरे, चंद्रकला धुमाळ आदींची नावे चर्चेत येत आहे. चर्चेमध्ये वेगवेगळी नावे असली तरी प्रत्यक्षात महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणं हे उत्सुकतेचे करणार आहे महापौर पदासाठी अनेक नगरसेविकांकडून दावा केला जाणार आहे.यासाठी स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर लॉबिंग देखील सुरू झालेली आहे.

सलग तीन वेळेला दिपाली कुलकर्णी निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार पक्षाला करावा लागू शकतो. परंतु मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सतीश कुलकर्णी यांना महापौर पद दिले होते.ब्राह्मण समाजाला यापूर्वी संधी मिळालेली आहे. त्यामुळे दिपाली कुलकर्णी यांना संधी मिळते की नाही हे पहावे लागेल.त्यांना पुन्हा संधी मिळाली तर ब्राह्मण समाजाला दोन वेळा महापौर पद दिल्याचे दिसून येईल. त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज यांची नाराजी भाजपला होऊ शकते.

त्यानंतर राजकीय वारसा असलेल्या हिमगौरी आडके यादेखील चर्चेत आहेत.आडके यांनी यापूर्वी स्थायी समितीचे सभापती पद देखील भूषविलेले आहे. त्यांना राजकीय वारसा देखील आहे.माजी मंत्री डॉ.डी. एस. आहेर यांच्या त्या पुतणी आणि आमदार आमदार राहुल यांच्या भगिनी आहेत. माजी उपमहापौर शोभना आहेर यांच्या त्या कन्या आहेत.त्यामुळे त्यांचे पारडे काहीसे भक्कम मानले जाते. परंतु भारतीय जनता पार्टी काय निर्णय घेईल ते पहावे लागेल.

मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मर्जीतल्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वाती भामरे यांचे नाव देखील महापौर पदाच्या शर्यतीत आहे.त्यांना संधी मिळते की नाही हे बघावे लागणार आहे. महापौर पदासाठी त्यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा केली जात आहे नाशिक शहरात प्रामुख्याने चर्चिल्या जाणाऱ्या नावांमध्ये स्वाती भामरे यांच्या नावाची चर्चा आहे.

सरप्राइज नाव मिळू शकते

नाशिक महापौर पदाच्या नावासाठी भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या नगरसेविकांचे नावे चर्चेत आहे.परंतु भारतीय जनता पार्टीने यापूर्वी चर्चेत असलेले नावे टाळून अचानक एका नवीन चेहऱ्याला संधी देऊन त्यांना महापौर केल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात मिळतात. त्यामुळे नाशिक मध्ये देखील ऐन वेळेला भारतीय जनता पार्टी चर्चेत असलेल्या नावांपेक्षा नाशिक शहरवासीयांना एक नवीन चेहरा देऊन सुखद धक्का देऊ शकते, अशी शक्यता देखील आहे.

दिपाली गीते यांचे नाव आघाडीवर

नाशिक महापौर पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर लगेचच नाशिक महापालिकेच्या वर्तुळामध्ये म्हणजेच अधिकारी कर्मचारी राजकीय घटक प्रसिद्धी माध्यमे व्यापारी उद्योजक यांच्यामध्ये एकाच नावाची जोरदार चर्चा शहरभर रंगलेली दिसून येत होती. ते नाव म्हणजे दिपाली गणेश गीते हे आहे. त्यांच्या नावाची चर्चा होण्याचे विशेष कारण म्हणजे त्यांचे पती गणेश गीते यांनी नाशिक महापालिकेचा कार्यभार अगदी जवळून हाताळलेला आहे. स्थायी समितीचे सभापती पद त्यांच्याकडे होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले कामे आजही चर्चेत आहे. सर्वांना मिळून मिसळून वागणूक देणारे युवा नेते अशी त्यांची विशेष ओळख आहे. पक्षातील बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहे. त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांचे देखील ते समर्थक मानले जातात. परिणामी दिपाली गणेश गीते यांचे नाव अधिक प्रमाणात चर्चेत आलेले दिसते.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version