Home Blog काका व पुतणे झाले पराभूत, मंगला आढाव अन् प्रशांत दिवे पुन्हा झाले...

काका व पुतणे झाले पराभूत, मंगला आढाव अन् प्रशांत दिवे पुन्हा झाले नगरसेवक

0
679 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

प्रभाग १७ मधील निवडणुक निकालानंतर ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांना मोठा धक्का बसला.माजी नगरसेवक शैलेश ढगे यांनी त्यांचा पराभव केला. २०१२ नंतर पुन्हा ढगे यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. अर्थात त्यावेळी संजय पागेरे यांना मिळालेल्या मतांचा आणि यावेळेला राजेश आढाव यांना मिळालेल्या मतांचा मोठा हातभार विजयात लाभलेला दिसतो. त्यांना मिळालेल्या मतांमुळे दिनकर आढाव यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे मंगला आढाव आणि प्रशांत दिवे यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकून त्यांना पुन्हा विजयी केले.

माजी नगरसेवक दिनकर आढाव जेष्ठ नेते आहे. परिसराच्या विकासात त्यांचा मोठा सहभाग मानला जातो.१९९२ पासून झालेल्या महानगर पालिका निवडणुकीत ते केवळ २०१२ मधील निवडणुकीचा अपवाद वगळला तर दिनकर आढाव कायम निवडून आले.२०१२ नंतर २०२६ मध्ये त्यांचा पराभव झाला. योगायोग असा की दोनही वेळेला शैलेश ढगे यांनीच पराभव केला.

प्रभागात सुरुवातीला भाजप आणि दिनकर आढाव यांना अनुकूल वातावरण मानले जात होते. त्यांचा विजय निश्चित आहे. असे चित्र होते.पण भाजपच्या उमेदवारी वाटपात काहीसा गोंधळ झाला. त्यामुळे त्यांना प्रतिकूल आणि एकूणच भाजपला नकारात्मक वातावरण तयार झाले. दिनकर आढाव यांना पॅनल मध्ये प्रशांत दिवे यांचा अपवाद वगळला तर तुल्यबळ उमेदवार मिळाले नाहीत. त्यांच्या सोबत पॅनेल मध्ये कैलास मैंद यांच्या पत्नी प्रमिला मैंद उमेदवार असायला हव्या होत्या. त्यांचा भाजप पॅनल मध्ये समावेश असता तर कदाचित आज चित्र वेगळे असते.असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. परंतु पराभव हा पराभव असतो. जर आणि तर या शब्दांना राजकारणात महत्व नसते.

शैलेश ढगे यांनी मिळविलेल्या विजयात खरे तर त्यांचे वैयक्तिक योगदान नाकारता येत नाही. जनते सोबत असणारा त्यांचा सततचा संपर्क आणि संवाद ही ढगे यांची जमेची बाजू ठरते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ढगे यांचा विजय मिळविला.संघर्ष आणि संयमाने त्यांनी विजय मिळविलेला आहे.

मंगला आढाव अन् दिवे यांना पुन्हा संधी

शांत आणि मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणाऱ्या मंगला आढाव यांचा अपेक्षित विजय मानावा लागेल. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. प्रचंड दबाव आणि दडपण येऊन देखील त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहण्याचा ठाम निश्चय केला. इतर राजकीय पक्षांची प्रलोभने त्यांनी नाकारली. शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहून मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला. त्यांच्या सोबत प्रशांत दिवे यांचा विजय देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. प्रभागात भाजपच्या विरोधात जबरदस्त लाट होती.पण त्या लाटेला पार करून प्रशांत दिवे यांनी मिळविले विजय नेत्रदीपक आणि नोंद घेणारा rhrala आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version