Home Blog प्रभाग १७ मध्ये परिवर्तन अटळ ! ; यंदा काकांच्या नव्हे तर पुतण्याच्या...

प्रभाग १७ मध्ये परिवर्तन अटळ ! ; यंदा काकांच्या नव्हे तर पुतण्याच्या गळ्यात विजयाची माळ !

0
189 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यावेळेला प्रभाग १७ मधील सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील निवडणूक लक्षवेधन आणि चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेष्ठ नगरसेवक दिनकर आढाव भाजपकडून तर त्यांचे पुतणे त्यांच्याच समोर शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक रिंगणात आहे. दोघेही एकमेकांच्या समोरासमोर आहे. याकडे सर्वांचेच लक्ष आहे. लक्षवेधक ठरू पाहणाऱ्या लढतीत पुतणे राजेश आढाव यांचे पारडे वरचढ दिसते.यावेळेला प्रभागात परिवर्तन अटळ आहे. काकांच्या नव्हे तर पुतण्याच्या गळ्यात विजयाची माळ पडेल. अशी खात्री आणि चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होतांना दिसते.

प्रभाग १७ मध्ये ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव पुन्हा एकदा निवडणुक रिंगणात आहे. नाशिक महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून त्यांनी झालेल्या सर्व निवडणुका लढविलेल्या आहेत.यामध्ये सन २०१२ चा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकीत त्यांनी विजय मिळविलेला आहे. त्यामुळे ते ज्येष्ठ नगरसेवक म्हणून प्रभागात चर्चेत आहे.या वेळेला त्यांचे पुतणे राजेश आढाव त्यांच्या समोर निवडणूक लढवत आहे. दोघेही आमने-सामने आहेत. काका पुतण्यांची लढत म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

राजेश आढाव हे देखील पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते आहेत.भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले,मेहनत घेतली. परंतु ऐन वेळेला भाजपने त्यांचे चुलते म्हणजेच काका दिनकर आढाव यांना उमेदवारी जाहीर केली. राजेश आढाव यांना डावलल्याने त्यांनी तत्काळ शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी स्वीकारली.

कोणत्याही परिस्थितीत या वेळेला काकांसमोर आपण निवडणूक लढवायची दृढ निश्चय त्यांनी केलेला होता. त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवत काकांच्या समोर निवडणुकीला दंड ठेव थोपटत त्यांना आव्हान दिले. त्यामुळे निवडणूक निकालाकडे प्रभागातील नव्हे तर संपूर्ण नाशिक शहरातील राजकीय नेतेमंडळींचे लक्ष लागून आहे. पुतणे राजेश आढाव यांनी प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. रात्र दिवस एक करून निवडणुकीत अगदी स्वतःला झोपून दिले.

प्रामाणिकपणाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,असा एक मेसेज त्यांनी मतदार मतदारांपर्यंत पोहोचविला. त्यामुळे मतदारांचा देखील त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. राजेश भाऊ यावेळेला आम्ही नक्की परिवर्तन करून तुम्हालाच मतदान करून विजयाची माळ तुमच्या गळ्यात घालू. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया राजेश आढाव यांच्याकडे मतदारांकडून प्राप्त होताना दिसत आहे.त्यामुळे राजेश आढाव आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला दिसतो. प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रतिसादामुळे या प्रभागात परिवर्तन असून राजेश आढाव हे निश्चितपणे निवडून येतील असा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो आहे. यामुळे सन २०२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभागात परिवर्तन अटळ आहे. काकांना आव्हान निर्माण करून राजेश आढाव निश्चितपणे विजय मिळविणार,अशी खात्री त्यांच्या सार्थकांना आहे.

नको तेच तेच चेहरे,हवे परिवर्तन

राजेश आढाव यांनी प्रचारादरम्यान आपल्याला काय अनुभव मिळाले हे कथित केले. मतदारांमध्ये बदल करण्याची प्रबळ इच्छा जाणवते. तेच तेच उमेदवार आमच्यावर लादले जात आहे. तरुणांना न्याय मिळत नाही. नाविलाजाणे आम्हाला ज्येष्ठ लोकांना मतदान करावे लागत होते .परंतु या वेळेला आमच्यासमोर शिवसेना शिंदे गटाने उत्तम पर्याय उपलब्ध करून दिले आहे. राजेश आढाव तरुण चेहरा आहे.आम्ही तुमच्या सोबत आहे. तुमच्या काकांना अनेक वेळा संधी दिली.
यापुढे आम्ही बदल घडवू,तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, तुम्हालाच आम्ही महापालिकेत पाठवू,असा शब्द प्रचारादरम्यान मला वारंवार मिळाला. असे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश आढाव यांनी सांगितले. त्यामुळे यावेळेला परिवर्तन अटळ राहील.माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असे राजेश आढाव यांनी स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version