Home Blog प्रभाग १८ मध्ये परिवर्तन अटळ ! ; सामान्य जनतेत वावरणारा ॲड. सुनील...

प्रभाग १८ मध्ये परिवर्तन अटळ ! ; सामान्य जनतेत वावरणारा ॲड. सुनील बोराडे यांच्या सारखा सुसंकृत लोकप्रतिनिधी हवा

0
107 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

जेलरोड परिसरातील प्रभाग १८ मध्ये राजकीय बदलाचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. येथील भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या धनुष्याचा जोर दिसतोय. मागील निवडणुकीत भाजपच्या पाठीमागे उभा असणारा मतदार आता परिवर्तनाची मागणी करू लागला आहे. परिवर्तनाचे बोल बोलू लागला आहे. यावेळेला कोणत्याही परिस्थितीत प्रभागात परिवर्तन अटळ आहे. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रभाग १८ मध्ये उमटताना दिसतात.सामान्य जनतेत वावरणारा ॲड. सुनील बोराडे यांच्या सारखा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी हवा. अशी चर्चा आहे.

ॲड सुनील बोराडे यांनी २००७ मध्ये निवडणूक लढवलेली आहे.अपक्ष म्हणून त्यांनी विजय प्राप्त केला. नाशिकरोड प्रभागाचे सभापती पद देखील त्यांनी भूषविलेले आहे. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. प्रभागात उत्तम संपर्क ठेवून आहेत.एक सुसंस्कृत चेहरा म्हणून अशी त्यांची ओळख आहे.प्रभागातील समस्या कशा प्रकारे सोडवाव्यात याचा अनुभव त्यांच्या जवळ आहे. विकास कामे राबविताना कुठल्या कामांना प्राधान्य द्यायला हवे, याची उत्तम जाण सुनील बोराडे यांना आहे. सुनील बोराडे यावेळेस प्रभाग १८ मधून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. स्थानिक प्रश्नांची सविस्तर माहिती असल्यामुळे त्यांना या वेळेला मतदारांची सात देखील लाभण्याची अधिक शक्यता वाटते. मतदार या वेळेला परिवर्तनाच्या मूडमध्ये दिसतात. त्यांच्या मते पूर्वी ज्यांना संधी दिली त्यांनाच या वेळेला संधी दिली पाहिजे, असे काही नाही. या वेळेला आपण निश्चितपणे परिवर्तन घडवून आणू. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मतदारांमध्ये दिसतात. ॲड सुनील बोराडे यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे.त्यामुळे ते पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत भरले आहे. कोणत्याही परिस्थितीत या वेळेला ॲड सुनील बोराडे यांना नाशिक महापालिकेत सदस्य म्हणून पाठविण्याचा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्याचबरोबर त्यांना मतदारांची देखील साथ मिळते आहे. यावेळेला प्रभाग १८ मध्ये परिवर्तन होऊन शिवसेनेचे ॲड सुनील बोराडे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना आहे.

ॲड. सुनील बोराडे म्हणतात…

मागील अनेक वर्षापासून मी समाज आणि राजकारणात सक्रिय आहे. राजकारण करताना कोणतीही सूडबुद्धी ठेवत नाही.याविषयी प्रभागातील जनतेला चांगली माहिती आहे. माझ्यासोबत काम करणारे समाजासाठी झटणारे आणि नागरिकांना मदत करणारे, अहोरात्र मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत.त्यांचे पाठबळ माझ्यासोबत आहे.विनाकारण मी कुणालाही त्रास देत नाही. आणि त्रास करून घेत नाही. राजकारण राजकारणाच्या जागी आणि समाजकारण समाजकारणाच्या जागेवर असा माझा दंडक आहे.त्यामुळे जनता माझ्यावर विश्वास ठेवून आहे. यावेळेला मला खात्री आहे की जनता मला पुन्हा एकदा नाशिक महापालिकेत सेवा करण्यासाठी पाठविणार आहे. अशी प्रतिक्रिया ॲड सुनील बोराडे यांनी व्यक्त केली.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version