Home Blog शिवसैनिक म्हणतात …, शीतल ताकाटे यांच्यावर अन्यायच ! ; निवडणुकीत विजयी करून...

शिवसैनिक म्हणतात …, शीतल ताकाटे यांच्यावर अन्यायच ! ; निवडणुकीत विजयी करून जनता जनार्दन अन्याय दूर करणार !

0
162 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

प्रभाग १८ मधून मागील काही वर्षापासून निवडणूक लढविण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या शीतल ताकाटे यांना शिवसेना शिंदे गटाने अचानक उमेदवारी नाकारली. एकप्रकारे शीतल ताकाटे यांच्यावर अन्यायच झालेला आहे. तो प्रभागातील जनता शीतल ताकाटे यांना निवडणूक देऊन निश्चितपणे दूर करेल, मतदार शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाना सोबत बेबी वॉकर निशाणीला मतदान करून निवडूण देतील असा आत्मविश्वास येथील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचा ए.बी.फॉर्म मिळून देखील काही तांत्रिक कारणांनी धनुष्यबाण निशाणी मिळू शकली नाही. परंतु बेबी वॉकर निशाणी घेत शीतल ताकाटे यांचा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ॲड सुनील बोराडे, सुनीता भोजने , आशा पवार यांच्या सोबत जोरदार प्रचार सुरू आहे. जनता शीतल ताकाटे यांच्यासोबत राहील असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

शिवा ताकाटे सुरुवातीपासून शिंदे शिवसेनेसोबत

शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाशी शिवा ताकाटे हे गेल्या साडेतीन वर्षांपासून एकनिष्ठ आहेत. २०२२ मध्ये शिवसेनेत दोन गट पडून एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्या दिवसापासून ताकाटे हे त्यांच्या सोबत आहेत. यादरम्यान नाशिक शहरातील नेते, आजी, माजी नगरसेवक पदाधिकारी हे शिंदेंसोबत नव्हते. मात्र ताकाटे हे प्रथमपासून एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ आहे. शिवा ताकाटे यांना किंवा त्यांच्या पत्नी शीतल ताकाटे यांना जेलरोड येथील प्रभाग १८ मधून निवडणूक लढवायची होती. या प्रभागावर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकवावा म्हणून ते पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यासाठी या प्रभागाचा पॅनल भक्कम व्हावा व सर्व उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी त्यांनी माजी नगरसेवक

शीतल ताकाटे यांच्यावर अन्यायच!

सुनील बोराडे तसेच सागर भोजने त्यांच्या पत्नी सुनीता भोजने, विशाल पवार व त्यांच्या मातोश्री आशा पवार या सर्वांचा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते, राजू लवटे, विलास शिंदे यांच्या उपस्थित करून घेतला. हे सर्वजण या प्रवेशाचे साक्षीदार आहेत. महापालिका निवडणूक घोषित झाल्यानंतर पक्षाचा एबी फॉर्म स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत ताकाटे त्यांना देण्यात आला. हे सर्व खरे असताना रंजना बोराडे यांना एबी फॉर्म कोणी दिला व कसा मिळाला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे खरा अन्याय शीतल ताकाटे व शिवा ताकाटे यांच्यावरच झाला आहे, कारण ताकाटे कुटुंबीय गेल्या साडेतीन वर्षांपासून शिवसेना शिंदे गटाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत.

तिघांना उमेदवारी शिवा ताकाटे यांच्यामुळे

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या तीन उमेदवारांना ताकाटे यांच्यामुळेच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे शीतल ताकाटे यांना सहानुभूती दाखवून सोबत घेतले कोणी काही आरोप करत असेल तरी त्या आरोपाला मतदार बळी पडणार नाही. शीतल ताकाटे यांना खऱ्या निष्ठेवे फळ मतदार मतपेटीतून निश्चित देतील व त्या विजयी होऊन महापालिकेत नगरसेवक म्हणून जातील, असा विश्वास प्रभागातील शिवसैनिक व मतदारांनी व्यक्त केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version