नाशिकरोड : उमेश देशमुख
जेलरोड परिसरातील प्रभाग १७ मध्ये काका आणि पुतण्याची लढाई लक्षवेधक ठरणार आहे. १९९२ पासून झालेल्या महानगर पालिकेच्या एका पंचवार्षिक निवडणुकीचा अपवाद वगळता आजवर काकांनी म्हणजे भाजपचे उमेदवार दिनकर आढाव यांनीच या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु सद्या त्यांना त्यांचे पुतणे राजेश आढाव यांनी आव्हान दिले आहे. ते शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी करीत आहेत. काका आणि पुतणे यांच्यापैकी कुणाला एकाला निवडणून द्यायचे असा पेच नागरिकांपुढे असणार आहे. मात्र यावेळेला मतदार नक्की परिवर्तन घडवणार असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश आढाव यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग १७ मधील सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील लढत मोठी चुरशीची आणि लक्षवेधक ठरू शकते. येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि उबाठा अशी तिरंगी लढत होणार आहे. परंतु सर्वांचे लक्ष काका आणि पुतणे यांच्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लागून आहे. यामध्ये सध्या पुतणे राजेश आढाव यांच्या नावाची जोरदार चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये रंगलेली दिसते. यावेळेला कोणत्याही परिस्थिती मध्ये प्रभागातील जनतेला बदल हवा असून ते निश्चितपणे राजेश आढाव यांना विजयी करून परिवर्तन घडवून दाखवतील.प्रभागातील जनतेचा कल यावेळेला काहीतरी नवीन बदल करून दाखविण्याच्या मनस्थितीमध्ये वाटतो. नवीन मतदारांची भूमिका अगदी स्पष दिसते. त्यांच्या मते प्रभागात बदल होणे ही काळाची गरज आहे. केवळ एकच व्यक्तीच्या हातात सतत सत्ता देणे चुकीचे आहे. तसे होत असेल तर एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सूत्रे असतात. त्यामुळे ते ठरवतील तीच पूर्वदिशा अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे प्रभाग १७ मध्ये नकीच बदल होऊन जनता तरुण नेतृत्व असणारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश आढाव आणि त्यांचे सहकारी सुशीला लोखंडे, विजयता डावरे, राहुल कोथमिरे यांना विजयी करून प्रभागात परिवर्तन घडवून दाखवतील अशी चर्चा केली जाते आहे.
नवीन नेतृत्वाला संधी मिळणार
राजकारणात बदल घडवायचे असतील आणि विकासाचे साध्य करावयाचा असेल तर नवीन नेतृत्वाने पुढे येणे काळाची गरज आहे. त्यासाठी जनता जनार्दनाने देखील पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी देखील नवीन नेतृत्वाला संधी उपलब्ध करून द्यायला हवी. नाही तर एकाच व्यक्तीची मर्जी सुरू असते. कालांतराने ती व्यक्ती कोणालाही जुमानत नाही. परिणामी प्रभागाचा विकास खुंटतो.त्यावेळी वेळ निघून गेली असते. पुढच्या निवडणुकीची प्रतिक्षा करावी लागते.प्रभाग १७ मधील जनता सुज्ञ आहे. त्यांनी यावेळेला माझ्यासारखे तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्यासोबत सहकारी सुशीला लोखंडे, विजयता डावरे, राहुल कोथमिरे यांना देखील निवडूण देत संपूर्ण प्रभागात परिवर्तन घडवून दाखवतील. असे परखड मत राजेश आढाव यांनी व्यक्त केले.
सक्षम पर्याय उपलब्ध, परिवर्तन अटळ !
प्रभाग १७ मध्ये यावेळेला परिवर्तन अटळ दिसते. प्रभागात विकासकामे रखडलेली आहे. मूलभूत सुविधा उत्तमप्रकारे राबविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविषयी न बोलणेच उत्तम वाटते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर खूपच जटिल वाटतो. समस्यावाढत आहे. विकासकामे रखडलेली आहे. राजकीय नेतृत्व उदासीन दिसते. या समस्यांना नागरिक प्रचंड कंटाळलेले आहे. त्यामुळे यावेळेला janatwoudhe शिंदे गटाच्या उमेदवारांचा सक्षम पर्याय उपलब्स असल्याने परिवर्तन निश्चितपणे अटळ मानले जाते आहे.