नाशिकरोड : उमेश देशमुख
नाथपंथी गोसावी समाज विकास संस्थेतर्फे नाशिक महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १७ मधील शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांना समाजाचा पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील पाठिंबा असणारे लेखी पत्र समाजातर्फे शिंदे गटाच्या उमेदवारांना देण्यात आले. नाथपंथीय समाजाचे अध्यक्ष संतोष नाथ यांच्या सूचनेनुसार पाठिंबा दर्शविण्यात आला.त्यामुळे प्रभाग १७ मधील शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयाचे शुभसंकेत मिळाले आहे.

प्रभाग १७ मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना यापूर्वी धनगर समाजाच्या यशवंत सेनेने जाहीर पाठिंबा दर्शवत तसे लेखी पत्र दिले होते. त्यानंतर नाथपंथीय गोसावी समाज संस्थेने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक १७ मधील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. त्यांचे राजकीय दृष्ट्या पारडे जड झालेले दिसून येत आहे. नाथपंथीय समाजाने दिलेल्या पाठींबा पत्रात म्हटले की,
दिनांक १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत सर्व समाज बांधवाना विनंती करण्यात येते की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आपले मतदान करायचे आहे. सर्व उमेदवारांना नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. जेल रोड प्रभाग क्रमांक. १७ चे शिवसेना शिंदे गट उमेदवार राजेश आढाव, सुशीला लोखंडे, विजयता डावरे आणि राहुल कोथमिरे यांना सर्व नाथपंथीय समाज बांधव यांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेना उमेदवारांना पाठिंबा वाढतोय
प्रभाग १७ मधील शिवसेना उमेदवार राजेश आढाव, सुशीला लोखंडे, विजयता डावरे आणि राहुल कोथिंबीर यांना सर्व थरातून पाठिंबा मिळतो आहे. सुरुवातीला धनगर समाजाने पाठिंबा दर्शविला. त्यानंतर आता नाथपंथीय गोसावी समाजाने देखील पाठिंबा दर्शविला.सामान्य जनतेतून देखील शिवसेना शिंदे गटाचे गटाचे उमेदवारांना प्रतिसाद मिळतो आहे.त्यामुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग १७ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांचे पारडे जड झालेले दिसते. त्यामुळे आमच्याच पक्षाचे उमेदवार निवडून येतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे केला जातो आहे.
मोठ्या मताधिक्याने विजयाचा दावा
प्रभाग १७ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मिळत असून त्यांना विजयी करण्यासाठी मतदारांचा पुढाकार दिसतोय.पक्षीय पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मात्र मतदारांचा पाठिंबा हवा असतो.तो पाठिंबा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांना मिळतो आहे. त्यामुळे त्यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल. असा आत्मविश्वास समर्थकांना वाटतो आहे.