Home Blog भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शिंदे गटाच्या उमेदवारांची तक्रार ! ; प्रलोभने दाखवून...

भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शिंदे गटाच्या उमेदवारांची तक्रार ! ; प्रलोभने दाखवून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप ! ; निवडणूक पथकाच्या पंचनाम्याचा vidio बघा

0
584 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रभागात आदर्श आचारसंहिता भंग केल्याची लेखी तक्रार शिंदे गटाच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी ( दि. ९ ) दाखल केली. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी केली. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले. येथून मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे, केबल्स आदी साहित्य जप्त करून पंचनामा केला. त्यामुळे आता निवडणूक आयोग भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर नेमकी काय कारवाई करणार,याकडे शिंदे गटाच्या उमेदवारांचे लक्ष आहे.

*महापालिका निवडणुकीत प्रभाग १७ मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना नाथपंथी गोसावी समाज विकास संस्थेचा जाहीर पाठिंबा*

भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शिंदे गटाच्या उमेदवारांची तक्रार ! ; प्रलोभने दाखवून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप ! ; निवडणूक पथकाच्या पंचनाम्याचा vidio बघा

केंद्र आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमध्ये नाशिक महापालिका निवडणुकी दरम्यान वादाची ठिणगी पडते की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे ठरू शकते. नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणूकिचा धुरळा सुरू असताना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी भाजपच्या चार उमेदवारांवर प्रचारादरम्यान आदर्श निवडणूक अचारहसिंतेचा भंग केल्याची लेखी तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे.

शुक्रवारी ( दि. ९ ) प्रचार काळात दुपारी दीड वाजेच्या दरम्यान प्रभागातील मध्यवर्ती ठिकाणी आणि महापालिकेच्या पथदीपावर मोफत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी काही स्थानिक नागरिक आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याना याविषयी माहिती मिळाली. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले. तत्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी येथून जप्त केलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या,केबल्स आणि डीव्हीआर आदी वस्तूंचा पंचनामा केला.

महापालिकेच्या जागेत कोणी केले बोरिंग

सद्गुरू नगर येथील दत्त मंदिराच्या जवळ महापालिकेच्या जागेत पाण्याची बोरिंग करण्यात आली आहे. बोरिंग कोणी आणि का केली. यास महापालिकेची परवानगी होती किंवा नाही.बोर करण्याची मागणी कोणी केली आहे. याविषयी आता निवडणूक आयोगाला चौकशी करावी लागणार आहे.

यांनी केली तक्रार

शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग १८ मधील अधिकृत उमेदवार ॲड.सुनील कारभारी बोराडे तसेच स्थानिक नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीचा आशय असा, भाजपचे उमेदवार विशाल संगमनेरे, सुशीला बोराडे, शरद मोरे आणि ज्योती माळवे यांनी आचारसंहिता सुरू असताना प्रभागात मोफत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणे, मोफत बोरिंग करून देणे, घरपट्टी भरून देणे आदी. कामे करून निवडणूक आचारसंहितेचा भंग करीत आहे.याविषयी चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version