Home राजकारण “मला आमदार झाल्यासारखं वाटतंय” ! ; निवडणूक लोकसभेच्या अन तयारी विधानसभेची

“मला आमदार झाल्यासारखं वाटतंय” ! ; निवडणूक लोकसभेच्या अन तयारी विधानसभेची

0
208 Post Views

नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी ( दि.२० ) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आणि महायुतीकडून हेमंत गोडसे निवडणूक रिंगणात आहे. दोनीही बाजुचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. निवडणूक लोकसभेचे असली तरी तयारी मात्र विधानसभेची केली जात असल्याची चर्चा नाशिक पूर्व मतदार संघात केली जाते आहे.नाशिक पूर्व मतदार संघामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या नावाची चर्चा होतांना दिसते. दोघेही महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.

दोघे ही नेते प्रचार प्रक्रियेत सहभागी असून ते राजाभाऊ वाजे यांचा प्रचार करतांना दिसत आहे. दत्ता गायकवाड यांनी तर राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा जणू काही विडाच अंगावर उचललेला दिसतो, अशा अविर्भावात ते प्रचारात झोकून घेताना दिसतात.कधी नव्हे इतक्या ऍक्टिव्ह मोडमध्ये दत्ता गायकवाड आलेले दिसतात. गायकवाड यांच्या समर्थक अन कार्यकर्त्यांकडून दत्ता नाना आता नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याची चर्चा केली जाते आहे. निवडणूक लोकसभेची अन तयारी विधानसभेची असे चित्र असून दत्ता गायकवाड यांच्या समर्थकांना दत्ता नाना जणू काही आमदार झाल्यासारखे वाटत आहे. त्याचे कारण देखील आहे. जेलरोड येथे राजाभाऊ वाजे यांच्या सभेचे गायकवाड यांनी यशस्वीपणे आयोजन करून दाखविले. त्याचप्रमाणे नाशिकरोड परिसरात राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचे नियोजन देखील यशस्वीपणे हाताळलेले दिसते.

“जगदीश गोडसे समर्थक देखील जोरात”

प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे लपून राहिलेले नाही. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी मागील काही महिन्यापूर्वी प्रेस कामगारांचा भव्य मेळावा घेतलेला आहे. मेळाव्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी त्यांना नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून गोडसे इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याचप्रमाणे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये गोडसे मतदारांच्या सतत संपर्कात वावरताना दिसतात. यापूर्वीच घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार सुरू केलेला दिसतोय. विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती स्पष्ट दिसत आहे. जेलरोड येथील गोडसे यांच्या घराच्या वास्तुशांतीला तसेच वाढदिवसाला शरद पवार यांनी लावलेली हजेरी सर्वांच्या नजरेत भरणारी ठरली आहे. परिसरात प्रेस कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.त्याचप्रमाणे प्रेस कामगार नेते म्हणून काम करताना त्यांनी मयत कामगारांच्या वारसाचा प्रश्न सोडविण्यास हातभार लावला असून ही त्यांची जमेची बाजू दिसते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version