Home Blog नाशिकमध्ये रावणराज उलथून रामराज्य आणा ! उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे प्रचार...

नाशिकमध्ये रावणराज उलथून रामराज्य आणा ! उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे प्रचार सभेत आवाहन

0
345 Post Views

 

नाशिकरोड : उमेश देशमुख

शहरात रावणाचे राज्य उलथवून श्रीरामाचे राज्य आणायचे आहे. नाशिकरांनो तुम्हाला खोट्या आश्वासनाला बळी पडायचे की प्रामाणिकपणाला साथ द्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे. आपल्याला सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणारा अन् विकासकामे करणारा महापौर या शहरात बसवायचा आहे.असे परखड मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व्यक्त केले.

विहित गाव येथील साई ग्रँड लॉन्स मध्ये शिवसेना ठाकरे गट व मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड मनसेचे सलीम मामा शेख तसेच खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते उपजिल्हाप्रमुख भैय्या मणियार केशव पोरजे योगेश गाडेकर, हेमंत गायकवाड योगिता गायकवाड, , नितीन पंडित , विनायक पगारे,प्रमोद साखरे आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या देशात आणि राज्यात कोण सुरक्षित आहे ते सांगा लाडक्या बहिणीला फसविले जात आहे शेतकरी आत्महत्या करत आहे पण कर्जमाफी केली नाही नवीन उद्योगधंदे नाशिकमध्ये का येत नाही याचे उत्तर द्या खोटे बोलून रेटायचे एवढेच सध्या काम सुरू आहे आमचे प्रेम नाशिकवर आहे नाशिकच्या बिल्डरवर नाही आम्ही जे जे मुंबईत करून दाखवले ते नाशिक मध्ये करून दाखवणार आहोत असे मी तुम्हाला ठामपणे सांगतो नाशिकचे तपोवन आपल्याला वाचवायचे आहे.

असे बोलून ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व कोठे असून लोकांची दिशाभूल करत आहे. आपण सर्व नाशिककर म्हणून एकत्र आलो असून तुम्ही ठरवा कोणाला जिंकवायचे आहे राम आमच्या मनात आहे.तुमच्या मनात नाही तुमच्या मनात असते तर ते वृक्ष तोडायचा निर्णय घेतला नसता झाडे तोडून ते बिल्डरांच्या घशात टाकायचे आहे का असा असा सवाल ही त्यांनी केला.

ठाकरे पुढे म्हणाले की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना तुम्ही सोबत घेत आहात हे कशासाठी असे ते म्हणाले नाशिकचे चित्र सध्या बदलले असून मोठ्या प्रमाणात मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहे त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे आम्ही मुंबई पंचवीस वर्षे जे करून दाखविले ते आता नाशिक मध्ये करून दाखविणार आहोत असे आवाहन करून ते म्हणाले की येत्या निवडणुकीत शिवसेना मनसे युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

शहरात परिवर्तन अटळ ! हेमंत गायकवाड

मागील निवडणुकीत नाशिककरांनी आपली मते भाजपला दिली. परंतु प्रचंड भ्रमनिरास झाला. यावेळेला नाशिककर दुरुस्ती करुन महाविकास आघाडीचा महापौर निवडूण देतील असा आत्मविश्वास प्रभाग वीस मधील इच्छुक उमेदवार हेमंत गायकवाड यांनी सभेच्या निमित्ताने व्यक्त केला.

.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version