Home Blog शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग १८ मधील इच्छुकांचा शक्तीप्रदर्शन करून प्रचाराचा शुभारंभ ;...

शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग १८ मधील इच्छुकांचा शक्तीप्रदर्शन करून प्रचाराचा शुभारंभ ; बघा ड्रोन VIDO

0
1,424 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

प्रभाग १८ मधील शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी ( दि.२६ ) सकाळी अकरा वाजता पंचक गाव येथील मारुती मंदिरात ज्येष्ठ नागरिक तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवत प्रचाराला सुरुवात केली. इच्छुकांनी प्रभागात रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन दाखवत प्रचाराचा शुभारंभ केला. शिवसेनेचे विजय करंजकर, चंद्रकांत लवटे, विनायक ( बाबुराव ) आढाव यांच्यासह इच्छुकांचा रॅलीमध्ये सहभाग होता.

शिवसेनेचे इच्छुक उमेदवार ॲड.सुनील कारभारी बोराडे, सुनीता सागर भोजने, शितल शिवाजी ताकाटे,आशा चंद्रकात पवार, शिवा गाडे आदी इच्छुक उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांनी महादेव मंदिर, पंचक गाव शनी मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर परिसरात प्रचाराला सुरुवात केली. यावेळी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान ॲड. सुनील बोराडे सन २००७ ते २०१२ प्रभाग ३३ चे नगरसेवक होते. नाशिकरोड प्रभाग सभापती आणि महापालिकेत अपक्ष गटनेता म्हणून त्यांनी पद भूषविलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागात विकासकामे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांचा प्रचार केला जात आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते शिवा ताकाटे यांच्या पत्नी शितल ताकाटे इतर मागास प्रवर्गात इच्छुक आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. नवरात्री उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आयोजनात सहभाग असतो. कोरोना काळात काढा वाटप, रूग्णांना मदत, पाणी टंचाई दरम्यान टँकरने पाणी पुरवठा करणे,निवृत्तीवेतन, छत्री योजना, लाडकी बहिण योजना, बचत गट आदी योजना आणि उपक्रमांमध्ये शीतल ताकाटे यांनी पती शिवा ताकाटे यांच्या सोबत सहभाग नोंदवला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सागर जयदेव भोजने यांच्या पत्नी सुनीत सागर भोजने सर्वसाधारण महिला क गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांची त्यांना आवड आहे. त्याद्वारे त्यांचा प्रभागात सतत संपर्क असतो.राष्ट्रपुरुषांचा सार्वजनिक जयंती उत्सवात त्यांचा सहभाग असतो. दत्त जयंती, गोकुळाष्टमी आदी धार्मिक कार्यक्रमात विशेष योगदान असते. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे मोफत वाटप करणे, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजनात सहभाग असतो. विशेष म्हणजे सुनिता भोजने यांचे संवाद आणि भाषण कौशल्य परिसरात चर्चेत आहे.

आजच्या प्रचार शुभारंभास समर्थकांची गर्दी असल्याने इच्छुकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. प्रभागातील जनता आम्हाला निश्चितपणे विजयी करून संधी देतील असा आत्मविश्वास इच्छुकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version