179 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या ३३/११ केव्ही मुक्तीधाम विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ई बस चार्जिंगसाठी नवीन उच्चदाब केबल जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार (दि. १८ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुक्तिधाम (देवळाली) विद्युत उपकेंद्र अंतर्गत वीज पुरवठा बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
