200 Post Views
आरोग्य सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा नवा उपक्रम
नाशिक रोड : उमेश देशमुख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या “वैद्यकीय सहायता मदत कक्ष” या महत्त्वाच्या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमाच्या प्रदेशाध्यक्षपदी नाशिकचे प्रा. ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत केली.

याप्रसंगी व्यासपीठावर धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सचिव बी.एम. संदीप, आ. शिरीष नाईक,आ.हेमंत ओगले, प्रदेश प्रवक्ता सचिन सावंत, माजी आ.शिरीष चौधरी, माजी खासदार बापू चौरे, माजी आ. के.एन. बहीरम, तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील,संदीपभैय्या पाटील,शरदराव आहेर, ब्रिज दत्त,प्रभावती घोगरे,करण ससाणे,जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, गटनेते शाहू खैरे, सचिव राहुल दिवे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार,शहराध्यक्ष शाम तायडे,धुळे जिल्हाध्यक्ष प्रविण चौरे,शहराध्यक्ष साबीर शेख,प्रदेश सचिव रमेश कहांडोळे,भारत टाकेकर,सचिन गुजर,अजय फटांगरे,लकी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या विभागाच्या निर्मिती व नियुक्ती बाबत प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी भूमिका प्रस्ताविकातून स्पष्ट केली.शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सूत्रसंचलन केले, तर आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी मानले.
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई,केशव पाटील,अल्टमश शेख,संतोष ठाकूर,स्वप्नील पाटील,गौरव सोनार,गौरव पानगव्हाणे,स्वाती जाधव,बबलू खैरे,सुनील आव्हाड,रामदास धांडे,प्रा.अनिल पाटील,उद्धव पवार,वसंत ठाकूर,गणेश कोठुळे,के.के गांगुर्डे,शरद खैरनार,मधुकर शेलार,विनायक शिंदे,विनायक सांगळे,समीर देशमुख,हरेश्वर सुर्वे,प्रशांत बाविस्कर,गणपत चौधरी,शिवाजी कासव,नजीम शेख,गुणवंत होळकर,डॉ.विकास चांदर,दिनकर निकम,विजय पाटील ,नरेंद्र गीते,हनिफ बशीर आदि मान्यवर उपस्थित होते.
