Home Blog किरकोळ कारणांवरुन अनुकंपा भरतीचे प्रस्ताव रखडवून ठेवू नका !; अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर...

किरकोळ कारणांवरुन अनुकंपा भरतीचे प्रस्ताव रखडवून ठेवू नका !; अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर संघटनेच्या पदाधिका-यांची मागणी

0
185 Post Views

नाशिक : उमेश देशमुख

राज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागात अनुकंपा तत्वावर शिक्षकेत्तर सेवकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई आदी विविध पदांचा समावेश आहे. मानवेतचा दृष्टिकोन समोर ठेवून तातडीने रिक्त पदांच्या जागेवर अनुकंपा धारकांना नोकरी उपलब्ध करुन द्यायला हवी. परंतू किरकोळ कारणे पुढे करुन अनुकंपाचे प्रस्ताव संबधित अधिकारी वर्गाने रखडवून ठेवू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयांच्या महासंघाची संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख,महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश म्हसे व राज्याचे महासचिव रावसाहेब त्रिभवन यांनी शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकारी वर्गाकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर संघटनेच्या पदाधिका-यांनी सोमवारी [ दि. २९ ] पुणे येथील उच्च तंत्र शिक्षण विभागातील शिक्षण संचालक कार्यालयात संबधिक अधिकारी वर्गाची भेट घेवून रखडलेल्या अनुकंपा धारकांच्या प्रस्तावांना तातडीने मंजूरी घ्यावी, अशी मागणी केली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयांच्या महासंघाची संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख,संघटनेचे अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभवन, संघटेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विलास संगमनेरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिका-यांनी उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सहसंचालिका अर्चना बोराडे यांची भेट घेत चर्चा केली. नाशिकसह पुणे व अहिल्यानगर जिल्हयातील अनुकंपा धारकांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी केली. यांसदर्भात माहिती देतांना सहसंचालिका अर्चना बोराडे यांनी आम्ही संबधित अधिकारी वर्गाला शिक्षण सचांलक कार्यालयात लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे कारवाई देखील सुरु आहे. अशी माहिती शिष्टमंडळाला देत मागणीची दखला घेतली आहे.

न्यायलयाचे निरक्षण म्हणते…

मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिका प्रकरणी मा. न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवलेली आहेत. त्याप्रमाणे अनुकंपा तत्वावर नोकरी देणे मानवतेचा दृष्ठिकोण आहे. शिक्षण अधिकारी यांचेकडून चूकीचा अर्थ लावून अनुकंपाचे प्रस्ताव नाकारले जातात. अनुकंपा तत्वावरील नोकरी पदभरती नसते किंवा ही नविन पदनिर्मिती देखील नसते. यापूर्वीच्या मंजूर पदावरच ही नियुक्ती असते. पदभरती बंदी किंवा आकृतीबंधाचे कारण पुढे करुन अनुकंपा प्रस्ताव अमान्य करुन नये, शैक्षणिक पात्रतेनूसार अनुकंपाची पदे भरायला हवी.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version