183 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
१७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या सेवा पर्व कालावधीत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात महावितरण व प्रीत चॅरिटेबल संस्थेच्या सौजन्याने योजनेची थेट जागृती करण्यासाठी सौर प्रचार रथ तयार करण्यात आलेला आहे. “सोलरपे चर्चा” करीत मार्गक्रमण करणाऱ्या सूर्यघर योजनेच्या या सौर रथाला विद्युत भवन येथे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी आज मंगळवार (दि. २३) रोजी हिरवी झेंडी दाखवीत जनजागृतीला प्रारंभ केला.
