785 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी महापारेषण च्या १३२ केव्ही टाकळी सबस्टेशन मध्ये ३३ केव्ही एकेरी वाहिनीचे दुहेरी वाहिनीत रूपांतर करण्याचे अत्यावश्यक काम करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. २० सप्टेंबर) रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ च्या दरम्यान खालील वाहिनीवरील भागांचा विद्युत पुरवठा टप्याटप्याने अथवा विद्युत भार विभागला न गेल्यास पूर्ण काळ बंद राहण्याची शक्यता आहे.द्वारका, उपनगर आणि नाशिक रोड अंतर्गत संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
