Home Blog नाशिकरोड रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे डॉ. प्रशांत भुतडा यांचे आवाहन

नाशिकरोड रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे डॉ. प्रशांत भुतडा यांचे आवाहन

0
261 Post Views

 

नाशिकरोड : प्रतिनिधी

सुप्रेम मेडिकल फाऊंडेशन व रोटरी क्लब नाशिक सुप्रिम यांच्या संयुक्त विद्यमाने राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना नाशिकरोड रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील व्यक्ती , संस्था यांचे प्रस्ताव मागवण्यात येत आहे. इच्छुकांनी प्रत्यक्ष भेटून प्रस्ताव दाखल करावा,असे आवाहन सुप्रेम मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष व व्यापारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांनी केले.

नाशिकरोड येथील सुप्रेम मेडिकल फाउंडेशन व रोटरी क्लब नाशिक सुप्रिम हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात.सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी फाउंडेशन क्लब च्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना गौरवणार आहे. त्यासाठी क्रीडा, वैद्यकीय, प्रशासकीय, पोलीस दल, बचत गट किंवा संस्था, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती,प्रतिनिधी यांनी सुप्रेम हॉस्पिटल, आदित्य नगर, अशोका मार्ग येथे 16 सप्टेंबर पर्यंत आपले प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. सुषमा भुतडा, डॉ सुशील पारख, श्री अचल राजे ,डॉ रेश्मा घोडेराव यांनी केले आहे.

दरम्यान रविवार ( दि.२८ ) रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत भुतडा यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version